Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Payout : पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करा

Crop Insurance Compensation : संबधित विमा कंपनी व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी पिकविण्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावी.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात मागील दोन वर्षांत स्थानिक नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान झालेल्या परंतु अद्याप विमा रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करा, असे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. संबंधित विमा कंपनीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखूण पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.

२०२३-२४ व २०२४-२५ या वर्षात स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान या जोखीम बाबी अंतर्गत विमाप्रश्‍नी बुधवारी (ता. ७) पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री मेघना बोर्डीकर व आमदार राहुल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी संगीता सानप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उदय कुलकर्णी, आयसीआयसीआय लोंम्बार्ड कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, की संबधित विमा कंपनी व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी पिकविण्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावी. याबाबत कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये. या वेळी आमदार श्री. विटेकर, श्री. गुट्टे, श्री. पाटील यांनी शेतकऱ्यांना नसैगिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानपोटी पीकविम्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Farming: खानदेशात १० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता

Farmer Leaders Clashes: कांदादर बैठकीत शेतकरी संघटनांच्या नेत्यांत खडाजंगी

Pune APMC: भुसार वस्तूंवरील शुल्कामुळे महागाईत भर पडणार

Mumbai APMC Action: मुंबई बाजार समितीत अन्न, औषध प्रशासनाची कारवाई

Monsoon 2026: मॉन्सूनची आगेकूच

SCROLL FOR NEXT