Crop Insurance Company : पीकविमा कंपनीकडून फळ पीकविमा देण्यास विलंब

Crop Insurance Palghar : पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना २०२४ खरीप हंगामातील हवामान आधारित चिकू व आंबा फळपीक विमा नुकसानभरपाई वाटप करण्यास बजाज अलियान्झ कंपनी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप केला आहे.
Crop Insurance Company
Crop Insurance Companyagrowon
Published on
Updated on

Palghar : पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतदारांना २०२४ खरीप हंगामातील हवामान आधारित चिकू व आंबा फळपीक विमा नुकसानभरपाई वाटप करण्यास बजाज अलियान्झ कंपनी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा आरोप पालघर जिल्ह्यातील प्रगतिशील बागायतदार व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विजय म्हात्रे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी या प्रकाराने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम लवकरात लवकर जमा करण्यासाठी कंपनीला आदेश द्यावेत, अशी विनंती म्हात्रे यांनी केली आहे. पालघर जिल्ह्यातील चिकू बागायतादारांनी खरीप २०२४ (चिकू) एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत मध्ये नैसर्गिकरीत्या होणारे नुकसान भरपाई मिळण्यासाठी १८७१ शेतकऱ्यांनी ३४५० हेक्टर बागाांकरिता हेक्टरी ३५०० प्रमाणे बजाज अलियान्झ कंपनीकडे स्थानिक बँकांच्या माध्यमातून विमा सुरक्षा कवच नोंदविले आहे.

Crop Insurance Company
Crop Insurance: पीक विमा योजनेतील भरपाईचे संरक्षणच सरकारने काढले

त्याचप्रमाणे रब्बी २०२४ हंगामात (आंबा) २८०९ शेतकरी, २०२० हेक्टर जमिनीकरिता विमा सुरक्षा कवच नोंदविले आहे. मात्र चिकू व आंबा बागायतदारांना एप्रिल २०२५ महिन्याची ३० तारीख उलटून गेल्यानंतरही नुकसान भरपाई मिळालेली नाही. चिकू बागायतीसाठी एक जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत नैसर्गिक नुकसान झाल्यास ३० सप्टेंबरनंतर दोन महिन्यांच्या आत म्हणजेच ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचे निर्देश देत आहेत.

त्याचप्रमाणे आंबा पिकाचे देखील एक जानेवारी ते ३० एप्रिल या कालावधीत नुकसान झाल्यास ६० दिवसांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याचे कंपनीतला बंधनकारक आहे. यासाठी बजाज अलियान्झ इन्शुरन्स कंपनीबरोबर करार केला आहे. मात्र २०२४ रब्बी व खरीप हंगामात आंबा व चिकू बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com