Papaya Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Fruit : निरोगी आरोग्यासाठी पपई फायदेशीर

Healthy Papaya : चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई. हे फळ चवीच्या बरोबरीने आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.

Team Agrowon

मोनाली जोशी, डॉ.विजया पवार

Benefits of Papaya : चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई. हे फळ चवीच्या बरोबरीने आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.

पपईमध्ये तंतूमय घटक, कॅल्शिअम, पोटॅशियम, मॅग्नेशिअम आणि अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब, क आणि ई भरपूर प्रमाणात आहे. रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे त्वचेसाठी देखील खूप आरोग्यदायी आहे. याशिवाय शरीर डिटॉक्सही होते. त्यामुळे पपईचा आहारात समावेश करावा.

आरोग्यदायी फायदे

जीवनसत्त्व क आणि तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्याचा धोका टळतो.

कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच तंतूमय घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन घटवण्यासाठी पपई फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती मजबूतीसाठी आवश्‍यक असलेले जीवनसत्त्व ‘क’ पपईद्वारे मुबलक प्रमाणात मिळते.

चवीला गोड असली तरीदेखील रक्तातील साखर वाढत नाही. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे.

जीवनसत्त्व अ मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.

जीवनसत्त्व क प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन उपयुक्त आहे. जीवनसत्त्व क घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.

अनियमित मासिक पाळी तसेच मासिक पाळीच्या काळातील त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

ॲन्टीऑक्‍सिडंट घटक शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून संरक्षण करते. पपईतील बीटा कॅरोटीन आतड्यांच्या कर्करोगापासून संरक्षण करते.

दिवसभराच्या धावपळीनंतर वाटीभर पपईचे काप खाल्ल्यास थकवा होतो. तसेच जीवनसत्त्व क शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित राखते.

पोषक घटक (प्रति १०० ग्रॅम)

कॅलरी - ४२.८ किलो कॅलरी.

पाणी - ८८ ग्रॅम, चरबी- ०.१९,

कर्बोदके - ११ ग्रॅम, साखर ८ ग्रॅम

तंतूमय घटक- २.६ ग्रॅम,

जीवनसत्त्व ‘अ’ - १९ टक्के

बी१.थायमिन-०.०२३ मिलिग्रॅम

बी२. रिबोफ्लेविन- ०.०२७ मिलिग्रॅम

बी३. निॲसिन - ०.३५७ मिलिग्रॅम

जीवनसत्त्व ‘क’- ६२ मिलिग्रॅम

जीवनसत्त्व ई - ०.३ मिलिग्रॅम

कॅल्शिअम - २० मिलिग्रॅम

लोह - ०.२५ मिलिग्रॅम

मॅग्नेशिअम- २१ मिलिग्रॅम

पोटॅशिअम- १८२ मिलिग्रॅम

- मोनाली जोशी, ७२१९८५७४६०

(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग,अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT