औरंगाबादमध्ये टरबूज, खरबूज, चिकू, पपईचे दर स्थिर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात टरबूज, खरबूज, चिकूचे दर स्थिर राहिले. तर मोसंबीचे दर कमी अधिक राहिले. डाळिंबाचेही दरही कमी, अधिकच राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
Watermelon, melon in Aurangabad, Chiku, papaya prices stable
Watermelon, melon in Aurangabad, Chiku, papaya prices stable

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात टरबूज, खरबूज, चिकूचे दर स्थिर राहिले. तर मोसंबीचे दर कमी अधिक राहिले. डाळिंबाचेही दरही कमी, अधिकच राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १ ते ६ मार्च दरम्यान चिकूची आवक ८६ क्‍विंटल झाली. सरासरी दर ६५० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. खरबुजाची एकूण आवक १७३ क्‍विंटल झाली. १२ ते १०९ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या खरबूजला सरासरी ९०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टरबुजाची आवक २५७ क्‍विंटल झाली. ३३ ते ११४ क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या टरबूजाला सरासरी ४५० ते ५५० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. 

मोसंबीची आवक नगण्यच राहिली. ३० क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला सरासरी ३१५० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक ४ ते १३ क्‍विंटल दरम्यान झाली. संत्र्यांची आवक २३ क्‍विंटल झाली. त्यास २२५० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल दरम्यानचा दर मिळाला. डाळिंबाची आवक ३९ क्‍विंटल आवक झाली. त्यास सरासरी दर ३५०० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

द्राक्षाला २६०० ते ३००० रुपये

पपईची आवक ११४ क्‍विंटल झाली. तिला सरासरी ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. पपईची आवक २० ते ४० क्‍विंटल दरम्यान राहिली. द्राक्षाची आवक ४५८ क्‍विंटल झाली. ११२ ते १२० क्‍विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या द्राक्षाला सरासरी २६०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com