सरकारी संस्थांनी खरीप हंगामातील भात खरेदीचा वेग वाढवलाडिसेंबरच्या सुरुवातीला भातसाठा जवळपास १२ टक्क्यांनी वाढलाभात साठ्याचा हा विक्रमी उच्चांकयंदा वाढलेल्या भात साठ्यामुळे देशातून निर्यात वाढवण्याची संधी.India Rice Stocks Hit Record High: सरकारी संस्थांनी खरीप हंगामातील भात खरेदीचा (Paddy Procurement) वेग वाढवला आहे. यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीला भारतातील सरकारी गोदामांतील भातसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १२ टक्क्यांनी वाढून विक्रमी उच्चांकावर पोहोचला..भारत हा जगातील सर्वात मोठा तांदळाचा निर्यातदार देश आहे. यंदा वाढलेल्या भात साठ्यामुळे देशातून निर्यात वाढवण्याची संधी आहे. यामुळे थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्ध्या निर्यातदरांकडून होत असलेल्या पुरवठ्यावर दबाव येऊ शकतो..सरकारी आकडेवारीनुसार, १ डिसेंबरपर्यंत न भरडलेल्या भातासह तांदळाचा राज्याचा साठा एकूण ५७५.७ लाख मेट्रिक टन इतका विक्रमी होता. जो १ जानेवारीसाठी सरकारने निश्चित केलेल्या ७६.१ लाख टनांच्या उद्दिष्टापेक्षा खूपच अधिक आहे..Paddy Farmers Issues: बाजारपेठेअभावी शेतकरी चिंतेत.१ डिसेंबर रोजी गव्हाचा साठा २९१.४ लाख टन होता. जो गेल्या वर्षीच्या २०६ लाख टनांच्या तुलनेत अधिक आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते..Paddy Procurement: सिंधुदुर्गात भात खरेदीसाठी नोंदणी धीम्या गतीने .खुल्या बाजारातील भाव सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी आहेत. यामुळे राज्य सरकारी संस्था शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करत आहेत, असे व्यापारी सांगतात. ."सरकारकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होत असतानाही, व्यापाऱ्यांकडे निर्यातीसाठी मुबलक प्रमाणात धान्यसाठा उपलब्ध आहे," असेही सांगितले जात आहे. दरम्यान, १ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या विपणन वर्षात, सरकारने शेतकऱ्यांकडून ४२२ लाख टन भात खरेदी केली आहे..सध्या निर्यातीची मागणी तेवढी अधिक नाही. मात्र, रुपयातील घसरणीमुळे व्यापाऱ्यांना स्पर्धात्मक दरात करार करण्यास मदत होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे..जागतिक तांदळाच्या निर्यातीत भारताचा वाटा सुमारे ४० टक्के आहे. भारताने गेल्या मार्चमध्ये तांदूळ निर्यातीवरील निर्बंध हटवले होते. २०२५ मधील पहिल्या १० महिन्यांत देशातील तांदळाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७ टक्के वाढ झाली. ही निर्यात १८४.९ लाख टनांवर पोहोचली आहे..देशातून यंदा होणारी निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २५ टक्के वाढून २२५ लाख टनांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज तांदूळ निर्यातदार संघटनेने व्यक्त केला आहे..यावर्षी भाताव्यतिरिक्त, गहू साठा पुरेशा पातळीवर आहे. यामुळे सरकारला धान्याच्या किमती अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येत असल्याचे व्यापारी सांगतात. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.