Solapur News: महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने उपलब्ध करून दिलेले कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स - एआय) आधारित महाविस्तार हे ॲप अकोले खुर्द (ता. माढा) गावातील सर्व एक हजार १५२ शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे. त्यामुळे १०० टक्के शेतकरी ॲप इन्स्टॉल करणारे व वापरणारे हे गाव राज्यातील पहिले गाव ठरले आहे. .हवामान बदलासह कीड - रोग, बाजारपेठेतील अस्थिरता, माहितीचा अभाव अशा अनेक आव्हानांचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतीशी निगडीत सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध असणारे एआय महाविस्तार हे ॲप शेतकऱ्यांना दोन मेपासून उपलब्ध करून दिले आहे..आतापर्यंत १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे.त्यात सोलापूर जिल्ह्यातीलएक लाख ११ हजार ५३९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यांना शेतीची गुणवत्ता व उत्पादन वाढीसाठी हे ॲप उपयुक्त ठरतआहे..Kapas Kisan App: क्लिष्ट ‘कपास किसान अॅप’; शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप.‘कृषी’चे डाऊनलोडसह प्रात्यक्षिकशेतीसाठी उपयुक्त महाविस्तार ॲप शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे, यासाठी कृषी विभागाने नियोजनपूर्वक प्रयत्न केले..Mahavistar AI App: ‘महाविस्तार’ अॅप वापरात साक्री राज्यात अव्वल .महाडीबीटी, पीएम किसान,व फळबाग लागवड योजनेच्या लाभार्थ्यांना त्याची माहिती दिली. गावागावातील सार्वजनिक ठिकाणी त्याचा प्रचार - प्रसार केला..एआय महाविस्तार ॲप हा शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना आहे. त्याची उपयुक्तता कृषी विभागाकडील योजनांच्या लाभार्थ्यांना पटवून दिली. ग्रामपंचायत, कृषी सेवा केंद्रे, दूध डेअरी या ठिकाणी नियोजनबद्धरीत्या ॲपची माहिती दिली. शिवाय ॲप डाऊनलोड करून त्याच्या वापराबाबत प्रात्यक्षिके दाखवली. त्यामुले अकोले गावातील १०० टक्के शेतकऱ्यांनी ॲप डाऊनलोड केले. परिणामी त्यात गाव राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.- संजय पाटील, प्रभारी मंडल कृषी अधिकारी, टेंभुर्णी, ता. माढा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.