Latur News: शेतीची रक्तवाहिनी असलेल्या शेत व पाणंद रस्त्याच्या कामांसाठी राज्य सरकारने रविवारी (ता. १४) दमदार पाऊल टाकले आहे. पुर्वीची मातोश्री ग्रामसमृद्धी योजना अबाधित ठेवून नवीन मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ता योजना जाहीर केली आहे. योजनेत शेतरस्त्यांना क्रमांक देऊन पक्के शेत व पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. विधानसभा क्षेत्रनिहाय आमदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली असून पूर्वीच्या योजनेतील उणिवा व कमतरता नव्या योजनेत भरून काढण्यात आल्या आहेत. योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेत व पाणंद रस्त्यांना राजाश्रय मिळाला आहे..औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या योजनेसाठी पाच वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा केला होता. योजनेतून तयार झालेल्या रस्त्याचे नुकसान करणाऱ्याविरुद्ध शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्याखाली कारवाई होणार आहे. नवीन योजनेसाठी ३३ पानांचा शासन निर्णय काढताना सरकारने रस्ते तयार करण्यासाठीची कार्यपद्धत, विविध यंत्रणांच्या जबाबदाऱ्या तसेच राज्य, जिल्हा व विधानसभा पातळीवरील समितीच्या कार्यकक्षा व जबाबदाऱ्याही निश्चित केल्या आहेत. रस्त्यांच्या कामासाठी निविदेचे प्रारूप दिल्यामुळे या योजनेची तातडीने अंमलबजावणी होणार आहे..CM Baliraja Farm Road Scheme: शेतरस्त्यांचा प्रश्न सुटणार; मुख्यमंत्री बळीराजा शेत–पाणंद रस्ता योजनेला राज्य सरकारची मंजुरी.स्वतंत्र लेखाशिर्षासह चौदा योजनांतून निधीयोजनेसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडण्यात येणार असल्याने अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणार आहे. यासोबत कार्पोरेट कंपन्यांकडून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), स्वयंसेवी संस्था, पंधरावा वित्त आयोग, खासदार व आमदार फंड, ग्रामपंचायतीचे जनसुविधा व नागरी सुविधा अनुदान, खनिज विकास व जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी, ग्रामपंचायतींना मिळणारे महसूली अनुदान, स्वतःचे उत्पन्न, पेसा, ठक्कर बाप्पा, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, नावीन्यपूर्ण योजना, इतर जिल्हा योजना, मूलभूत सुविधा(२५१५) आदी १४ योजनांतूनही शेत व पाणंद रस्त्यांचे काम करता येणार आहेत..आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीत शेतकरीयोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने राज्य पातळीवर महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे. समितीत बारा आमदारांचा समावेश असून त्यात लातूर जिल्ह्यातील औसा रस्ता पॅटर्नचे जनक आमदार अभिमन्यू पवार व उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांचा समावेश आहे. जिल्हापातळीवर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून आमदारांच्या अध्यक्षतेखालील विधानसभा पातळीवरील समितीत पाच प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे..CM Baliraja Free Electricity : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा मार्ग मोकळा; निधी वितरणाला मंजूरी.नव्या योजनेत काय होणार?शेत व पाणंद रस्त्यांचे सीमांकन करून स्वतंत्र क्रमांक दिला जाणारग्रामपंचायत, पंचायत, समिती, जिल्हा परिषद, वनविभागही कामे करणाररस्त्यांचे २५ किलोमीटरचे क्लस्टर करून कामाची निविदा काढणारगाव नकाशावरील व शासकीय जागेतील अतिक्रमण सात दिवसात काढणारतलाव व नदीनाले खोलीकरणातून रस्त्यासाठी गाळ, माती व मुरूम उपलब्ध करणार.कामासाठी वापरलेल्या गाळ, माती व मुरुमाची रॉयल्टी माफरस्त्यांची तातडीची मोजणी भूमि अभिलेख विभागाकडून मोफत होणाररस्त्याची मोजणी, अतिक्रमण काढणे, कामांसाठी मोफत पोलिस बंदोबस्तशेतरस्ता हाच शेतकऱ्याच्या प्रगतीचा मार्ग असून त्यासाठी येणाऱ्या.सर्व अडचणी मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून सरकारने दूर केल्या आहेत. शेत व पाणंद रस्त्याला एकप्रकारे राजाश्रय मिळाला आहे. मागील चार ते पाच वर्षापासून यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ही योजना जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.- आमदार अभिमन्यू पवार, औसा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.