Raigad News: हजारो वर्षांपासून मासेमारीसाठी लाकडाच्या होड्या वापरात येत आहेत; मात्र मागील पाच वर्षांत लाकडांपासून होड्या बनवण्याचा व्यवसाय अडगळीत पडू लागला असून फायबर किंवा धातूच्या पत्र्यांपासून तयार केलेल्या मासेमारी बोटी बनवण्याचा व्यवसाय विकसित होत आहे. बेसुमार जंगलतोडीने होड्या बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या मजबूत लाकडांचा तुटवडा भासू लागल्याचे या वेळी सांगण्यात आले. त्यामुळेच याची जागा आता फायबर बोटीने घेतली आहे. सरकारने फायबर बोटीवरील नियम शिथिल केल्याने नौकानिर्मितीच्या नव्या व्यवसायाने पुन्हा गती घेतली आहे. .रायगड जिल्ह्यात आजच्या घडीला १८ लहान-मोठे कारखाने असून वर्षाला ७० ते ८० मध्यम आकाराच्या मासेमारी नौका येथे तयार केल्या जातात. या ठिकाणी पूर्वी लाकूडकाम करणारे सुतार आता दिसत नाहीत. वर्षोनुवर्षे लाकडी भक्कम बोटींच्या आधारे मासेमारी करणाऱ्या कोळी मच्छीमार बांधवांनी आता फायबरच्या बोटींचा पर्याय जवळ केला आहे. त्याचबरोबर मासेमारीचा फेरा लवकर पूर्ण करता यावा, यासाठी वेगवान नौका तयार करून घेण्याकडे कल वाढला आहे..Flour Manufacturing Industry : पीठ निर्मिती उद्योगातून बसविली आर्थिक घडी.लाकडी बोटींपेक्षा तुलनेने स्वस्त, टिकावू या बोटी वरसोली, अलिबाग, आक्षी-साखर, आगरदांडा, जीवना बंदरात मोठ्या प्रमाणात वापरात येऊ लागल्या आहेत. बंदरालगतच्या जंगलात विपुल प्रमाणात सापडणारे साग, किंजळ, शिसव यांसारख्या वृक्षामुळे येथील नौकानिर्मितीचा व्यवसाय भरभराटीस आला होता. .नौकानिर्मितीचा पिढीजात व्यवसाय करणारे संजय सुतार यांच्या माहितीनुसार १९६०च्या नंतर जंगलातून सहज उपलब्ध होणारा कच्चा माल कमी झाल्याने या व्यवसायाला उतरती कळा लागली होती. यामुळे वंशपरंपरागत या व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबांना हा व्यवसाय सोडावा लागला होता..Flour Manufacturing Industry : पीठ निर्मिती उद्योगातून बसविली आर्थिक घडी.मासेमारी व्यवसायाला उतरती कळा लागली असताना हा खर्च करणे मच्छीमारांना कठीण जात आहे. या कर्जाचे हप्ते, डिझेलचा परतावा देताना अनेक समस्या येतात. मासेमारी करून आल्यावर बोट सुकवावी लागते. तिला वर्षातून एकदा चंद्रसू नावाचे द्रावण चोपावे लागते. रंगरंगोटी, रंधा मारणे, डागडुजीसाठी येणारा खर्च हा दीड ते दोन लाख रुपये असतो. येथे सुरू झालेल्या या फायबर बोटी कमी खर्चात बांधून होतात. त्यांची डागडुजी तसेच इतर खर्चही लाकडी बोटींच्या तुलनेमध्ये कमी असतो. .ओहोटीच्या वेळेला कमी पाण्यातही या बोटी चांगल्या प्रकारे तरंगतात. या बोटींचा डागडुजीचा खर्च कमी आहे. त्याचबरोबर लाकडाच्या बोटींपेक्षा या बोटी कमीतकमी खर्चात बनवता येतात. फायबरच्या बोटी खूपच किफायतशीर असतात.- राजेश कोळी, आर. आर. फायबर, बोडणी मल्हारी मार्तक सहकारी.लाकडी बोटीला फायबर बोटी चांगला पर्याय आहे. ही बोट पाण्यात टिकाव धरणाऱ्या सागवान लाकडाचीच असते; मात्र आता लाकूड मिळण्याचे प्रमाण कमी झाले असून त्याच्या किंमतीही अव्वाच्या सव्वा वाढल्याने या बोटींचा खर्च वाढला आहे. फायबर बोटींना कर्ज मिळत असल्याने जुन्या बोटी मोडीत निघाल्या आहेत.- संजय पाटील, मत्स्यव्यवसाय सहउपायुक्त, रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.