MSP Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Soybean Market : शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाइन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक आदी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nanded News : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत एनसीसीएफच्यावतीने जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी ता. एक ऑक्टोबर पासून ऑनलाइन पोर्टलवर नोंदणीसाठी १३ खरेदी केंद्र निश्चित केली आहेत. या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.

मुग, उडीद खरेदी १० ऑक्टोबर व सोयाबीन खरेदी १५ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाइन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व बँकपासबूक आदी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या खरेदी केंद्रात मुखेड तालुका खरेदी विक्री संघ, मुखेड, हदगाव तालुका खरेदी विक्री संघ, हदगाव, लोहा तालुका खरेदी विक्री संघ, लोहा, कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट, तालुका खरेदी विक्री संघ, बिलोली (कासराळी), पंडित दीनदयाल उपाध्याय अभिनव सहकारी संस्था, देगलूर, मृष्णेश्वर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. धनज (ता. मुखेड), सिद्राम फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. बेटमोगरा (ता. मुखेड), किनवट तालुका कृषिमाल प्रक्रिया सहकारी संस्था गणेशपूर (ता. किनवट),

तिरुपती शहापूर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. वन्नाळी (ता. देगलूर), राधामाई फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. रातोळी (ता.नायगाव), अष्टविनायक शेतीमाल खरेदी विक्री सहकारी संस्था मानवाडी फाटा (ता. हदगाव), व श्रीजगदंब फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. जांब (बु) (ता. मुखेड) या ठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे.

उत्पादकता निश्‍चित नाही

या योजनेतंर्गत सोयाबीन, उडीद व मुगाची खरेदी व्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकते प्रमाणे प्रति शेतकरी आणि केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या उद्दिष्टांनुसार खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु या पिकांची उत्पादकता अद्याप निश्‍चित झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT