Jowar MSP Procurement : हमीभावाने ज्वारी खरेदीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Panan Federation President Dattatray Pansare : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे,
Jowar Procurement
Jowar Procurement Agrowon
Published on
Updated on

Pune News : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी दिली.

ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांची ज्वारी विक्री शिल्लक आहे. त्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.

Jowar Procurement
Jowar Procurement : अखेर शासनाकडून ज्वारी खरेदीचे आदेश धडकले

या बाबत संघाचे उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक मंडळाने वारंवार विनंती आणि पाठपुरावा केल्यानंतर अजित पवार यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून ज्वारी खरेदीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळवून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव योजनेचा लाभ होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळून आर्थिक फायदा होणार आहे, असे महासंघाचे अध्यक्ष पानसरे यांनी सांगितले.

Jowar Procurement
Jowar Market : ज्वारी उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भरडधान्याचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. राज्यात आता पणन महासंघासह आदिवासी विकास महामंडळ देखील हमीभावावर ज्वारी खरेदी करत आहे.

केंद्र शासनाने राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ मध्ये मका, ज्वारी व रागी हे भरडधान्य खरेदीच्या उद्दिष्टाला मंजुरी दिली आहे. ही मुदत ऑगस्टअखेर होती. मात्र अद्याप ज्वारी शिल्लक असल्याने मुदतवाढीचा पाठपुरावा पणन महासंघाद्वारे करण्यात आला होता. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com