Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पावसाच्या सरी; भातपीक कापणीत व्यत्यय

Rain Update : काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापणी केलेल्या भातपिकांची आवराआवर करताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी (ता. ३०) विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कापणी केलेल्या भातपिकांची आवराआवर करताना शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. काही ठिकाणी भातपीक पावसात भिजून नुकसान झाले. गुरुवारी (ता. ३१) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

जिल्ह्यात बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती होती. दुपारी साडेतीन वाजल्यापासून वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली.

भुईबावडा, करूळ घाट परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या भागात सरीवर सरी पडत होत्या. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांच्या बहुतांश भागात विजांसह पाऊस झाला. सायकांळी पाचपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस सुरू होता. किनारपट्टी भागातदेखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

जिल्ह्यात गेले काही पाऊस सायकांळी दुपारी चार-पाचपर्यंत उघडीप देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी भातपीक कापणीची गती वाढविली होती. बुधवारी सकाळपासूनच शेतकरी भातपीक कापणीत व्यग्र होते.

मोठ्या प्रमाणात भातपिकाची कापणी शेतकऱ्यांनी केली होती. परंतु विजांचा कडकडाट सुरू होताच शेतकऱ्यांची कापणी केलेल्या पिकांची आवराआवर करताना चांगलीच दमछाक झाली. अनेक शेतकऱ्यांचे कापणी केलेले पीक पावसात भिजून नुकसान झाले.

गुरुवारी सकाळपासून देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. हवामान विभागाने ३ नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे भातपीक उत्पादकांनी पावसाचा अंदाज घेऊनच पिकाची कापणी करावी. कापणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT