Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : म्हसळा तालुक्‍यात भातलावणीला वेग

Rain Update : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून तालुक्‍यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम असून तालुक्‍यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. रायगड जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद म्हसळा तालुक्यात झाली असून आतापर्यंत १४७८.८ मिमी तर सर्वात कमी खालापूर तालुक्यात ८६४.८ मिमी नोंद झाली आहे.

भातलावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यामुळे म्हसळा तालुक्यात लावणीच्या कामांना वेग आला आहे. म्हसळा तालुक्यातील ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांची भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. तालुक्यात एकूण १३५० हेक्टरवर भातशेती केली जाते. त्यापैकी अंदाजे ७५० हेक्टरवर लागवड झाली आहे.

तालुक्यामध्ये नाचणीचे क्षेत्र २६० हेक्टर आहे. नाचणी लागवडीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतात चिखल करत शेतकऱ्यांची भात लावणीची लगबग सुरू झाली आहे. भातलावणी करताना श्रम विसरण्यासाठी महिला कामगारांमध्ये वेगवेगळ्या गीतांचे स्वर ऐकू येत आहेत.

मागील आठवड्यापासून अत्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्याने नाचणी, वरी आदीच्‍या लावणीलासुद्धा वेग आला आहे. येथील काळसुरी, आडी ठाकूर-पाष्टी येथे तालुक्‍यातील कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT