Nashik News : नाशिक जिल्ह्यातील भात लागवडी यंदा समाधानकारक पावसाअभावी खोळंबल्या आहेत. अवघ्या १६ हजार हेक्टरवर लागवडी झाल्या असून त्याची टक्केवारी अवघी १८ टक्के आहे. मात्र लागवडी वेळेवर पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. सध्या पाऊस कमी असल्याने इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सध्या विहिरीतील संरक्षित पाण्यावर आवण्या करत आहेत.
जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, तालुक्यांत भात लागवडीचे क्षेत्र अधिक असते. तर कळवण, बागलाण, नाशिक, दिंडोरी, सिन्नर येथे लावगड कमी होते. तर अलीकडे निफाड तालुक्यात नगण्य लागवडी होत आहेत. त्यापैकी प्रमुख भात उत्पादक तालुका म्हणून इगतपुरीची ओळख आहे. मात्र येथे यंदा पावसाने आवण्या खोळंबल्या आहेत. अतिपर्जन्य छायेखालील असणाऱ्या या तालुक्यातील पूर्व भागात समाधानकारक पाऊस नसल्याने भात लागवडी लांबणीवर गेल्या आहेत. इतरही तालुक्यांत हीच बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करून पूर्व भागात लागवडी सुरू आहेत.
पेठ तालुक्यात तुलनेत कामाला वेग आहे. मात्र त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यांतील अनेक भागांत कामे खोलंबल्याची परिस्थिती आहे. तर कळवण, सटाणा तालुक्यात अजूनही लागवडी सुरू झालेल्या नाहीत. पावसानंतर भात बियाणे टाकून रोपे तयार करण्याची लगबग दिसून आली. अनेक ठिकाणी रोपे लागवडी योग्य झाल्याने काही शेतकऱ्यांनी संरक्षित पाण्यावर शेतात चिखल करून लागवडी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.
या भागातील टाकेद, बेलगाव, धामणी, पिंपळगाव मोर, खेड, टाकेदसह शेतकऱ्यांनी पर्यायी म्हणून विहिरीतील पाण्याचा वापर केला जात आहे. यातून तयार झालेल्या चिखलात लागवडी सुरू झाल्या आहेत. मात्र अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने लागवडींना वेग आलेला नाही.
जिल्ह्यातील भात पीक व लागवडीची स्थिती
जिल्ह्यातील भात लागवडीचे सरासरी क्षेत्र ८७४८८.९७ हेक्टर
झालेली प्रत्यक्ष लागवड १६४७२.०७ हेक्टर
टक्केवारी १८.८३
जिल्ह्यातील लागवडीची तालुकानिहाय स्थिती
तालुका क्षेत्र
(हेक्टर) झालेली लागवड (हेक्टर) टक्केवारी
इगतपुरी २८००९.६ ७८३२.९ २७.९७
सुरगाणा १५८८३.१७ ५३६ ३.३८
त्र्यंबकेश्वर १५४३० २९२८ १८.९८
पेठ ९४६२ ३७९५ ४०.११
कळवण ४५५८ ० ०
सटाणा २८९१ ० ०
सिन्नर १७८९.८ ५९.९ ३.३५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.