Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : भाताची ओंबी कापून नेण्याची वेळ

Crop Damage : पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने कापून ठेवलेल्या भातपिकाचे तण कुजून वाया गेले आहे. त्यामुळे लोंबी कापून ते पिशवीत घालून आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Team Agrowon

Wada News : तालुक्यात काही दिवसांपूर्वी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाची मोठी नासाडी झाली असून बळीराजा मेटाकुटीला आला आहे. पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने कापून ठेवलेल्या भातपिकाचे तण कुजून वाया गेले आहे.

त्यामुळे लोंबी कापून ते पिशवीत घालून आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तण शेतातच कुजून वाया गेल्याने ताणातून मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील निसर्गाने पाणी फिरवले आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.

तालुक्यात शेतकरी अनेक कृत्रिम आणि नैसर्गिक संकटांचा सामना करीत मोठ्या धैर्याने आपली शेती करीत आहे. प्रसंगी कर्ज काढून शेती करणाऱ्यांसमोर या नैसर्गिक संकटाचा डोंगर उभा राहिल्याने शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे, संसाराचा गाढा हाकायचा कसा, असे प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहेत.

सततच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून तातडीने ओळा दुष्काळ जाहीर करून शासनस्तरावरून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आणि शासकीय अधिकारी निवडणूक कामात सापडल्याने आपल्याला कुणी वालीच उरला नसल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या झालेल्या भातपिक नुकसानीचे शासनस्तरावरून प्रत्यक्ष पाहणी व पंचनामेच होत नाही. या समस्येकडे कोणाचेही लक्ष नसून कृषी व महसूल विभागातील अधिकारीच बेपत्ता असल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT