Paddy Crop Harvesting : भात पीक काढणीची लगबग

Paddy Farming : चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांना दिलासा मिळाला. सध्या अनेक ठिकाणी भात पीक निसवण्याच्या अवस्थेत असून, लवकर लागवड झालेले भात पीक काढणीच्या स्थितीत आहेत.
Paddy Production
Paddy ProductionAgrowon
Published on
Updated on

Pune News : चालू वर्षी वेळेवर दाखल झालेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भात उत्पादकांना दिलासा मिळाला. सध्या अनेक ठिकाणी भात पीक निसवण्याच्या अवस्थेत असून, लवकर लागवड झालेले भात पीक काढणीच्या स्थितीत आहेत. मॉन्सूनोत्तर पावसामुळे काही ठिकाणी नुकसान झाले असले तरी येत्या काळात भाताचे चांगले उत्पन्न हातात येण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

यंदा जूनच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेच्या कामास सुरुवात केली होती. जवळपास २० ते २५ दिवसांत भात रोपे पुनर्लागवडीस आली. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीच्या कामांना चांगलाच वेग आला होता. यंदा मजुरांची टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी करण्यावर भर दिला. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी पूर्ण केल्या आहेत.

Paddy Production
Paddy MSP : भातपिकाला हमीभावाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत. जिल्ह्यातील भात पट्ट्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ६० हजार ८५७ हेक्टर म्हणजेच १०२ टक्के क्षेत्रावर भात लागवड झाली होती. परंतु ऑगस्टमध्ये पावसाच्या खंडामुळे भात पीक काही प्रमाणात अडचणीत आले होते. त्यामुळे अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे भात पिकांना चांगलाच आधार मिळाला. सध्या बहुतांश भागात भात पीक काढणीच्या स्थितीत आहेत.

Paddy Production
Paddy Harvesting : खेडच्या पश्‍चिम पट्ट्यात भात पिकाच्या कापणीसाठी आधुनिक तंत्राला प्राधान्य

भाताच्या विविध वाणांची लागवड

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भात वाणांच्या लागवडीवर भर दिला आहे. त्यासोबत कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाणांच्या वाणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मावळसह भोर, मुळशी तालुक्यात पारंपारिक चारसुत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com