Paddy Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : भातपीक परिपक्व होण्यास सुरुवात

Latest Agriculture News : जिल्ह्यात तीन टप्प्यांत भातरोप वाटिका तयार केल्या जातात. त्यानुसारच भातरोपांची पुनर्लागवड केली जाते. या वर्षी देखील तीन टप्प्यात भातरोप पुनर्लागवड करण्यात आली होती.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पुनर्लागवड केलेले भातपीक आता परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. साधारणपणे जिल्ह्यात ५ टक्के पिके कापणीला आली आहेत. मात्र सध्या पडत असलेल्या पावसामुळे परिपक्व भातपिकांच्या कापणीत अडथळा निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात तीन टप्प्यांत भातरोप वाटिका तयार केल्या जातात. त्यानुसारच भातरोपांची पुनर्लागवड केली जाते. या वर्षी देखील तीन टप्प्यात भातरोप पुनर्लागवड करण्यात आली होती. २० जूनच्या सुमारास पहिल्या टप्प्यातील ५ टक्के भातरोपांची पुनर्लागवड करण्यात आली होती.

दरम्यान, या वर्षी पहिल्या टप्प्यातील लागवड झाल्यानंतर जुलैमध्ये चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे या पिकांची वाढदेखील चांगली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील भातपिके आता परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे.

येत्या आठ ते दहा दिवसांत या पिकांची कापणी करणे आवश्यक आहे. मात्र सध्या जिल्ह्यात हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जाहीर केला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी पडत आहेत. आणखी पाच- सहा दिवस पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे या पिकांची कापणी करणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरेल.

जिल्ह्यात या वर्षी ६० हजार हेक्टरवर भातपीक लागवड आहे. पहिल्या टप्प्यात पाच टक्के, दुसऱ्या टप्प्यात १०, तर तिसऱ्या टप्प्यात ८५ टक्के पिके कापणीला येतील, असा अंदाज आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील भात परिपक्व होण्यास अजून पंधरा दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT