Gharkul Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Yojana : वाशीम जिल्ह्यात ६३ हजारांहून अधिक घरकुल योजनेस हिरवा कंदील

PM Aawas Yojana : पंतप्रधान आवास योजनेचे ४४ हजार सहाशे ५९ आणि रमाई आवासचे १९ हजार ५६ असे एकूण ६३ हजार ७१५ घरकुलांना या वर्षीच्या कृती आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यात महाआवास योजना अत्यंत प्रभावी व पारदर्शकपणे राबविण्यात येत असून याअंतर्गत जिल्ह्यात ६३ हजारांवर घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत यापैकी १० एप्रिलपर्यंत सहा हजार दोनशे घरकुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिले आहेत.

तसेच पैसे मागितले जात असल्यास तत्काळ पुराव्यासह तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले आहे. पंतप्रधान आवास योजनेचे ४४ हजार सहाशे ५९ आणि रमाई आवासचे १९ हजार ५६ असे एकूण ६३ हजार ७१५ घरकुलांना या वर्षीच्या कृती आराखड्यात मंजुरी देण्यात आली आहे.

तसेच याशिवाय इतरही योजनांमधून घरकुलांचा लाभ देण्यात येणार आहे. विशेषतः बौद्ध व अनुसूचित जाती समूहांच्या लाभार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेसाठी तब्बल १९ हजार ५६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

स्वत:चे पक्के घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातून हजारो ग्रामीण कुटुंबांचे हे स्वप्न पूर्ण होत आहे. यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या विभागाची टीम पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.

या विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम केल्यास या गामाला गती येईल आणि ग्रामीण भागातील लोकांचे घरकुलाचे स्वप्नही साकार होईल. त्यामुळे घरकुलाचा लाभ देताना एकाही लाभार्थ्यास त्रास होणार नाही आणि त्यांना वेळेत हप्ते मिळतील याची खबरदारी घेण्याच्या सूचना सीईओ वाघमारे यांनी या विभागाशी संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुढील दोन महिन्यांत जिल्ह्यात तब्बल सहा हजार दोनशे घरकुले बांधण्यात येणार आहेत. यामध्ये मालेगाव तालुक्यात १२०० आणि उर्वरित ५ तालुक्यांना प्रत्येकी एक हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. येणाऱ्या १० एप्रिलपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे.

पैसे मागितले जात असल्यास तत्काळ पुराव्यासह तक्रार करा

जिल्ह्यामध्ये, पंतप्रधान घरकुल, रमाई, शबरी, मोदी घरकुल योजने अंतर्गत घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घरकुले मंजूर करण्यास अथवा हप्ते वितरण करण्यास विलंब होत असल्यास सुद्धा संबंधित नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे पुराव्यांसह तक्रार करावी.

घरकुले मंजूर करताना व घरकुलाचे विविध हप्ते मंजूर करताना कोणालाही कोणतेही पैसे द्यावयाची गरज नाही. शासनाचे कोणतेही काम करण्यास शासकीय फीच्या व्यतिरिक्त घरकुलासाठी एखादी व्यक्त्ती पैशाची मागणी करीत असल्यास पुराव्यांसह तक्रार करावी, असे आवाहन वाशीम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीत २०१९ मधील पुनर्गठित कर्जाचा विचार करावा, रणधीर सावरकरांची विधानसभेत मागणी

Sangli Water Storage: सांगलीतील प्रकल्पांत अवघा १९ टक्के पाणीसाठा

Farmers Protest: सरसकट कर्जमाफीसाठी आज पारनेर तहसीलवर जनआक्रोश मोर्चा

Vegetable Cultivation Delayed: सांगलीत भाजीपाला लागवड रखडली

Satara Rain Update: सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT