Gharkul Yojana : घरकुलाचा निधी परत जाण्याची शक्यता वाढली

PM Aavas Yojana : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज आहे. पण अनेक ठिकाणी अद्यापही रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले नाही. आता याचा मोठा फटका गरीब व शेतमजुरांना बसत आहे.
Gharkul Scheme
PM Awas Yojana Agrowon
Published on
Updated on

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गौण खनिज आहे. पण अनेक ठिकाणी अद्यापही रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले नाही. आता याचा मोठा फटका गरीब व शेतमजुरांना बसत आहे. चंद्रपुरातील गोंडपिंपरी येथील ११७ गरिबांना घरकुल मंजूर झाले.

निर्धारित वेळेत त्यांना बांधकाम करावयाचे होते. पण वाळूच मिळत नसल्याने नाइलाजाने त्यांना बांधकाम थांबवावे लागले. आता यामुळे घरकुलाचा निधी परत जाण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी घरकुलधारक बांधवांत कमालीचा संताप आहे.

Gharkul Scheme
Gharkul Yojana : बुलडण्यातील ६४ हजार घरकुलांना मंजुरी

गरिबांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी पंतप्रधान आवाज योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत चंद्रपुरातील गोंडपिंपरी येथे ११७ गरीब कुटुंबांना घरकुल मंजूर झाले. त्यांनी जोरात कामही सुरू केले. पण वाळूच मिळत नसल्याने आता त्यांचे काम अर्धवट आहे. धरकुलधारकांना प्रशासनाकडून वाळूचा पुरवठा करण्यात येतो.

पण आता प्रशासनाने देखिल हात झटकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे विहित मुदतीत घर बांधावयाचे आहे. पण दुसरीकडे वाळूच नसल्याने गोरगरिबांपुढे नवे संकट आहे. विहित मुदतीत जर बांधकाम झाले नाही तर निधी परत जाणार व आपले स्वप्न भंगणार अशी भीती त्यांना आहे.

दरम्यान घरकुलधारक वसंत चिलनकर, कालीदास गेडाम, रामदास गेडाम, समर्थ फाले, इंदिरा येलमुले व इतर घरकुलधारकांनी मुख्याधिकारी विवेक चौधरी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. आपली आपबितीही त्यांच्यापुढे कथन केली. वाळूअभावी आपल्या स्वप्नांचा चकनाचूर होत असल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

Gharkul Scheme
Gharkul Yojana : बेघरांचे स्वप्न साकारणार, आता शेतातही बांधा घरकुल

धानोरकरांचा आमरण उपोषणाचा इशारा

रेतीघाट सुरू करावे अन्यथा उपोषण करू, असा इशारा शिंदे गटाचे चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख नितीन धानोरकर यांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

वाळूअभावी गोरगरिबांचे होणारे हाल बघता मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना पत्र लिहिले. घरकुलधारकांना तत्काळ वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. सोबतच विहित मुदतीत बांधकाम न झाल्यास हा निधी परत जाऊ शकतो, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com