Ration card e-KYC Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Card KYC : जालन्यात तीन लाख रेशन कार्डधारकांचे ‘केवायसी’ प्रलंबित

National Food Security : राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते.

Team Agrowon

Jalna News : राज्य सरकारने रेशन कार्डधारकांना ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वेळोवेळी वाढवून दिली. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील ३ लाख ३६ हजार ९७ रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ७९ टक्के रेशन कार्डधारकांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून २१ टक्के कार्डधारक अद्यापही बाकी आहेत.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांची अद्ययावत माहितीसाठी स्वस्त धान्य दुकानदारांच्या ई-पॉस मशीनद्वारे ई- केवायसी करून ग्राहकाची माहिती शिधापत्रिकेला जोडली जात आहे. यासाठी आधार कार्डनुसार बोटाचे ठसे घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

जिल्ह्यात १५ लाख ८९ हजार ८८८ रेशन कार्डधारक आहेत. यापैकी ४ ऑगस्टपर्यंत १२ लाख ५३ हजार ७९१ लाभार्थींचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. तर, २२ हजार ३७९ जणांची ई-केवायसी नाकारण्यात आली आहे.

तसेच, ३ लाख २९ हजार ५३६ लाभार्थींची ई-केवायसी ई-पॉस मशीनवर प्रलंबित असून ३ लाख ३६ हजार ९७ जणांची ई-केवायसी अद्याप होणे बाकी असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, वेळोवेळी मुदतवाढ देऊनही अद्याप २१ टक्के केवायसी बाकीच आहे.

एकूण रेशन कार्डधारक - १५ लाख ८९ हजार ८८८.

ई-केवायसी पूर्ण झालेले कार्डधारक - १२ लाख ५३ हजार ७९१.

ई-केवायसी प्रलंबित कार्डधारक - ३ लाख ३६ हजार ९७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Home Industry: नाचणी, भाजीपाल्याच्या पापडांची चव न्यारी

Rural Development: ग्रामविकास, बचत गटाला चालना देणारी ‘वनश्री’

Weekly Weather: हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Eknath Shinde: दरडीप्रवण भागातील कुटुंबांचे पुनर्वसन करणार : एकनाथ शिंदे

Sugarcane Workers Welfare: ऊसतोड मजुरांच्या आरोग्य समस्येवर ‘साथी’चा इलाज

SCROLL FOR NEXT