Cotton Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Disease : कपाशीवरील रोगांच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता

Team Agrowon

Chalisgaon News : या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात काही ठिकाणी अतिपावासाने कपाशीचे नुकसान झाले असून, त्यातच वातावरणात होणाऱ्या बदलामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे, फुलकिडे, बोंडसड, गुलाबी बोंडअळी, आदी कीड-रोगांचा प्रादुर्भावसह लाल्या ही विकृती दिसून येत आहे.

तालुक्यातील ६१ हजार हेक्टरवर लागवड झालेल्या कपाशीवर होणाऱ्या विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चाळीसगाव तालुक्यात बागायती कपाशीचे ३० हजार १३८ हेक्टर तर जिरायत कपाशीचे ३० हजार २१३ हेक्टर क्षेत्र आहे.

अशा एकूण ६१ हजार ५१ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लागवड थोडी वाढलेली आहे. वातावरणातील बदलाव विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विविध रोगांचा प्रादुर्भाव

कपाशीवर सध्या मावा, फुलकिडी, पांढरी माशी, तुडतुडे, बोंडसड, करपा, गुलाबी बोंडअळीसह बहुतांस भागात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. शेतकरी विविध उपायोजना करीत असले तरी पाहिजे तसा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

यंदा तालुक्यात वरुणराजाची कृपादृष्टी चांगली झालेली असताना होणाऱ्या या नुकसानाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. ज्या काही भागात मावा, तुडतुडे, पांढरी माशी तसेच फुलकिडे या रसशोषक किडींचा कपाशीवर प्रादुर्भाव होत आहे. अशा कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन येथील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कपाशीवर होत असलेल्या विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे गावागावात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. कपाशीवर जैविक व रासायनिक खतांची फवारणी करताना योग्य प्रमाणातच करावी.
- धनजंय पाटील, मंडळ कृषी अधिकारी, चाळीसगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : अतिवृष्टी नुकसानीचे २२ कोटी ३३ लाख अनुदान

Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

APMC Election : आमदारकीच्या इच्छुकांची बाजार समितीत कसोटी

Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

Rural Development : गट-तट विसरून गावे आदर्श करा

SCROLL FOR NEXT