Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

Cotton Crop : खाली ओल त्यात उन्हाची ऑक्टोबर हीट यामुळे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कपाशीच्या पिकात मोठ्या प्रमाणात पातेगळ होते आहे.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : खाली ओल त्यात उन्हाची ऑक्टोबर हीट यामुळे छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील कपाशीच्या पिकात मोठ्या प्रमाणात पातेगळ होते आहे. शिवाय काही ठिकाणी होत असलेल्या अधून मधून च्या पावसाने बोंडसडीचे प्रमाणही कायम असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

मराठवाड्यात यंदा परभणी, लातूर वगळता एकाही जिल्ह्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही. शिवाय हवामानाच्या प्रतिकुलतेचे संकट संपले नसल्याने कापूस उत्पादकांची चिंता कायम आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागाअंतर्गत तीन जिल्ह्यात सरासरी १० लाख ५९ हजार ३२४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९ लाख १८ हजार ३ हेक्टरवरच कपाशीची लागवड झाली.

Cotton Crop
Cotton Disease : कपाशीच्या पिकांमध्ये आकस्मिक मर

दुसरीकडे लातूर कृषी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यात सर्वसाधारण ४ लाख ८५ हजार ८८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ५४ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड झाली. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे कापूस उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. यापैकी परभणी वगळता एकाही जिल्ह्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही.

कपाशीचे पीक सध्या पाते, फुले व बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या जेवढी पाते लागले तेवढेही गळून पडत आहेत.

Cotton Crop
Cotton Disease : कपाशीवर ‘आकस्मिक मर’चे संकट

काही भागात १५ ते २० तर काही भागात २० ते ३० बोंड पकलेली आहेत. सतत होणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी खालची बोंड पूर्णतः काळी पडली आहेत. कपाशी लालसर होत असून पानेही वाळून चालली आहेत. यंदा उत्पादनात याचा मोठा फटका बसेल, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली

पातेगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. खालची बोंड काळी पडली पानही लालसर होऊन गळत आहेत. एक हेक्टरला आतापर्यंत ६० हजार खर्च झाला. वीस ते पंचवीस बोंड पकली. त्यात पैकी दहा ते बारा काळी पडली. एक बोंड कापूस अजून घरात नाही.
- मिठूभाऊ चव्हाण, भांडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
खाली जमीन ओली वरून उन्हाचा कडाका. पात टिकतच नाही. १०० टक्के पातेगळ होते आहे. २५ ते ३० बोंड लागली त्यापैकी चार-पाच बोंडसडग्रस्त आहेत.
- सदाशिव गीते, देवगावता, जि. छत्रपती संभाजीनगर.
६० ते ७० टक्के पातेगळ होते आहे. एक हेक्टर कपाशीतून अजून बोंड ही घरात आलं नाही. आमच्या भागात पाऊस तुलनेने कमी. आमच्या कोरडवाहू कपाशीला पंधरा ते वीस बोंड लागली. सड नाही पण पातं टिकेना त्यामुळे यंदा उत्पादनात निम्म्यापेक्षा जास्त घट होईल.
- बाळू कापसे, देळेगव्हाण, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com