Earth Day Agrowon
ॲग्रो विशेष

World Earth Day: आपली वसुंधरा ; आपली जबाबदारी

Climagte Change Issue: हवामान बदलामुळे दिवसेंदिवस वाढते तापमान, अवेळी अवकाळी पाऊस असे हवामान बदल जाणवत आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी वेळीच पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांना जागृत करण्यासाठी जगभरात २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

Team Agrowon

डॉ. शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे

April 22nd Earth Day: आपली पृथ्वी म्हणजेच वसुंधरा. तिची काळजी घेण्याची जबाबदारी ही आपल्या प्रत्येकाची आहे. त्यासाठी जगभरात दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसासाठी विशिष्ट घोषवाक्याची निवड केली जाते. यावर्षीचे घोषवाक्य ‘आपली ऊर्जा, आपली वसुंधरा’ (Our Power, Our Planet) असे आहे. पुनर्निर्माणक्षम ऊर्जेकडे वळण्याचा संकल्प करूयात असे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यावर्षीसाठी ‘आपली ऊर्जा, आपली वसुंधरा’ हे घोषवाक्य निवडण्यामागे जागतिक स्तरावर सध्याच्या बदलत्या हवामान स्थितीकडे लक्षकेंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हवामान बदलामुळे दिवसेंदिवस वाढते तापमान, अवेळी अवकाळी पाऊस असे हवामान बदल जाणवत आहेत. हेच हवामान बदलांचे स्वरूपात दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. या बदलांना रोखण्यासाठी योग्य पावले वेळीच उचलणे गरजेचे आहे. ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा, पेट्रोल, डिझेल यांचे ज्वलन केले जाते. त्यामुळे हवा आणि पाणी यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यावर नियंत्रण मिळविणे काळाची गरज आहे. ऊर्जा निर्मितीसाठी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून पर्यायी संसाधनांचा वापरावर अधिक भर द्यावा लागेल. त्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांचा वापर महत्त्वाचा आहे.

याशिवाय हवा आणि पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. रस्त्यावरील वाहनांची वाढत्या संख्या, कारखान्यामधून हवेत सोडण्यात येणारे विषारी वायू, उद्योगधंदे, जंगलतोड, वणवे, शेतातील शिल्लक पीक अवशेष जाळणे इत्यादी कारणांमुळे हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी, कारखान्यातून कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्या, समुद्रामध्ये सोडण्यात येणारे विषारी पाणी, प्लास्टिक कचरा अशी विविध कारणे पाणी प्रदूषण होण्यामागे आहेत. हवा आणि पाण्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे पृथ्वीचे तापमान दिवसेंदिवस वाढते आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.

इतिहास

अमेरिकेतील गेलॉर्ड नेल्सन आणि डेनिस हायेस दोन व्यक्तींनी २२ एप्रिल १९७० मध्ये स्थानिक लोकांना एकत्र आणत अमेरिकेत वाढलेल्या प्रदूषणाविषयी माहिती देण्यास सुरुवात केली. कारखान्यांमधून सोडण्यात येणारे विषारी वायू, नद्यांमध्ये सोडली जाणारी विषारी रसायने आणि शहरीकरणामुळे वाढलेली जंगलतोड याकडे लोकांचे लक्ष वेधले. लोकांमध्ये वाढत्या प्रदूषणाविषयी जागृती निर्माण होऊन तेथील सरकारला पर्यावरण कायद्यांबद्दल पुन्हा विचार करावा लागला. तेव्हापासून ‘२२ एप्रिल’ हा दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.

दरवर्षी या दिवसासाठी विशिष्ट घोषवाक्य निवडले जाते. मागील वर्षी प्लास्टिक वापर कमी करण्याविषयी घोषवाक्य तयार करण्यात आले होते. तर या वर्षासाठी ‘आपली ऊर्जा, आपली वसुंधरा’ हे घोषवाक्य निवडण्यात आले आहे.

वसुंधरा दिनाची उद्दिष्ट्ये

 नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण

 पाणी आणि मातीची गुणवत्ता सुधारणे.

 हवामान बदलांवर नियंत्रण

 बदलत्या हवामानामुळे होणारे नुकसान कमी करणे.

 शाश्वत ऊर्जा आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार.

 सौरऊर्जा वापरावर भर.

 ऊर्जेचा पुनर्वापर आणि पुनर्विनियोजनावर भर.

 शेतीमधील शिल्लक पीक अवशेषांचा खत म्हणून वापर.

आपली जबाबदारी

आपल्या पुढच्या पिढीसाठी स्वच्छ हवा, पाणी आणि हिरवीगार पृथ्वी ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने प्रदूषणावर नियंत्रण ठेवायला हवे. हवा आणि पाण्याचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे. मी प्रदूषण करणार नाही, करू देणार नाही यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. पर्यावरण पूरक घटकांवर भर द्यायला हवा.

पृथ्वीवर परिणाम करणारे घटक आणि शेतीवरील परिणाम

पृथ्वीवर परिणाम करणारे घटक शेतीवर होणारा परिणाम उपाय

हवामान बदल (तापमान वाढ, अनियमित पाऊस) पिकांची वाढ घटते, पाण्याची कमतरता, नवीन रोग आणि किडींचा प्रादुर्भाव. कार्बन उत्सर्जन कमी करणे, दुष्काळ-प्रतिरोधक आणि जल-व्यवस्थापन पद्धतींचा वापर करणे.

प्रदूषण (हवा, पाणी, जमीन) पिकांची गुणवत्ता घटते, जमिनीची सुपीकता कमी होते. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करणे, सेंद्रिय शेती करणे.

जंगलतोड जमिनीची धूप वाढते, पावसाचे प्रमाण घटते. वृक्षारोपण करणे, वन व्यवस्थापन सुधारणे.

पाण्याचा अतिवापर पिकांची वाढ खुंटते, पाण्याची कमतरता, जमिनीची क्षारता वाढते. ठिबक सिंचन, जलसंधारण करणे, कमी पाणी लागणारी पिके घेणे.

प्लास्टिक प्रदूषण जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, पिकांची वाढ खुंटते. प्लास्टिकचा वापर टाळणे, पुनर्वापर करणे.

माती, पाण्याचे महत्त्व

पिकांचे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतजमिनीचे आरोग्य उत्तम राहणे अत्यंत आवश्यक आहे. मागील काही वर्षांत अधिक उत्पादनाच्या हव्यासापायी जमिनीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा बेसुमार आणि अतिवापर वाढला आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य ढासळत चालले आहे. याचा थेट परिणाम एकूण उत्पन्नावर आणि अन्नसुरक्षेवर होत आहे. जमिनीमधून केवळ पिकांचे उत्पादन मिळते, असे नाही. तर जमीन विविध सूक्ष्मजीवांसाठी आश्रय स्थान आहे. याच जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे. रासायनिक घटकांच्या अतिवापराचा जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजिवांवर विपरीत परिणाम होतो. त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी पीक उत्पादनात घट येते.

जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी उपाय

सेंद्रिय घटकांचा वापर

शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत इत्यादी सेंद्रिय घटकांचा वापर करून जमिनीचे आरोग्य सुधारणे शक्य होते. यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सूक्ष्मजीवाणूंसाठी पोषक स्थिती निर्माण होते. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत मिळते.

पिकांची फेरपालट

एकाच क्षेत्रात एकाच पिकाची दरवर्षी लागवड केल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. त्यासाठी एकच पीक वारंवार घेणे टाळावे. पिकांची फेरपालट करावी. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहतो.

सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर

पिकामध्ये सिंचन करण्यासाठी पाटपाणी देणे टाळावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन सिंचन करण्यावर भर द्यावा. सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता तपासावी. सिंचनासाठी ठिबक, तुषार अशा आधुनिक सूक्ष्मसिंचन पद्धती अवलंब करावा. त्यामुळे सिंचनाच्या पाणी बचत होते.

संवर्धित शेती

मशागत कमी करणे, जमिनीवर पिकांचे अवशेष ठेवणे आणि पिकांची फेरपालट करणे या बाबींचा समावेश संवर्धित शेतीमध्ये होते. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. शिवाय उत्पादकता वाढीस चालना मिळते.

डॉ. शुभम दुरगुडे ९०२१५९०१५० (डॉ. शुभम दुरगुडे हे आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्र, बिहार येथे मृदा शास्त्रज्ञ, तर डॉ. अनिल दुरगुडे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT