
Buldana News : जिल्हा परिषद शाळांमधील घटती विद्यार्थी संख्या आणि ओस पडलेले वर्ग अशी चिंता अनेक ठिकाणी जाणवत असताना, बोराखेडी येथील जिल्हा परिषद शाळेने एक सकारात्मक उदाहरण निर्माण केले आहे. येथील शाळेतील गुणवत्ता, उपक्रमशीलता आणि शिक्षकांच्या समर्पणामुळे आज या शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘ॲडमिशन फुल’ असा फलक लावण्याची वेळ आली आहे.
सध्या या शाळेत ४२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ही संख्या वर्षागणिक वाढतच आहे. मुख्याध्यापक अनिल चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात असलेल्या या शाळेचा कायापालट करून तिला कॉन्व्हेंटची प्रतिमा दिली आहे.
वनराईने वेढलेला परिसर, निसर्गरम्य वातावरण, स्वच्छता, तांत्रिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापनामुळे ही शाळा जिल्ह्यातील आदर्श ठरली आहे. शाळेत इंग्रजी पूर्व प्राथमिक वर्ग, डिजिटल शिक्षण, खेळांचे मैदान, संगणक शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.
समाज आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेसाठी ३८ लाखांहून अधिक निधी लोकवर्गणीतून उभारण्यात आला असून, त्या माध्यमातून शाळेचे भौतिक रूप बदलले आहे. बोराखेडी शाळेला ‘ज्ञानरचनावादी शाळा’, ‘स्वच्छ शाळा’, ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा’, ‘शिक्षणातील दीपस्तंभ’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
याशिवाय शिक्षकांनाही विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. झपाटलेल्या शिक्षक आणि व्यवस्थापनाने ही शाळा केवळ शिकवण्याचे ठिकाण न ठेवता, ती ‘संस्कारांचे केंद्र’ आणि ‘समाज विकासाचा आधार’ बनवली आहे. बोराखेडी शाळेचा हा यशस्वी प्रवास इतर जिल्हा परिषद शाळांसाठी निश्चितच दीपस्तंभ ठरावा, असा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.