Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

Daily Commodity Rates: आज आपण गहू, उडीद, केळी, डाळिंब आणि मूग बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market Produts
Agriculture Market ProdutsAgrowon
Published on
Updated on

Market Bulletin:

डाळिंबाला उठाव कायम

वांगी बाजारातील आवक कमीच आहे. मागील महिनाभरात झालेल्या पावसाचाही डाळिंब पिकाला फटका बसला. त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत. डाळिंबाला उठाव चांगला असला तरी पुरवठा कमी आहे. त्यातही गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत. डाळिंबाला आज सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादीतच राहू शकते. त्यामुळे दरही तेजीत राहतील, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

मुगाचे भाव दबावात

मुगाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा खूपच कमी दर मिळत आहे. देशातील वाढलेले उत्पादन आणि वाढती आयात याचा दबाव दरावर आहे. तसेच इतर कडधान्याचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे मुगाचे भावही दबावात आले आहेत. दुसरीकडे मुगाला उठाव चांगला आहे. मात्र, पुरवठा चांगला असल्याने दर कमी आहेत. सध्या मूग प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. पुढील काळात मुगाची आवक मर्यादीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Agriculture Market Produts
Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

केळीचे दर तेजीत

केळीला बाजारात सध्या चांगला दर मिळत आहे. बाजारातील केळीला चांगला उठाव आहे. मात्र बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे केळीचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात केळी ३० रुपये ते ७० रुपये प्रतिडझन मिळत आहे. तर घाऊक बाजारात सध्या केळीला १८०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत. पुढील काळात केळीची आवक काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील जाणकार व्यापारी व्यक्त करत आहेत.

Agriculture Market Produts
Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

उडदाचे भाव स्थिर

वाढती आयात आणि देशातील बाजारातील आवक यामुळे उडदाचे भाव दबावात आहेत. सध्या उडदाला हमीभावापेक्षा कमी एक हजार ते दीड हजार रुपये कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. बाजारात सध्या उडीद ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयाने विकला जात आहे. बाजारातील उडदाची आवक पुढील दोन महीने कमीच राहण्याची शक्यता आहे. मात्र आयातही सुरु आहे. आयातीमुळे दर दबावात आहेत. बाजारातील ही परिस्थिती पुढील काळातही कायम राहू शकते. उडदाच्या भावात पुढील काळात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज उडीद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाचे दर स्थिर

देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारने लादलेले स्टाॅक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावले आहेत. बाजारातील गव्हाची आवकही कमी होत आहे. गव्हाचे भाव मागील महिनाभरात जवळपास २०० रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या गहू २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे. मात्र पुढील महिनाभरानंतर सणांची मागणी सुरु होईल. त्यामुळे गव्हाला उठाव राही. या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com