Milk Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Protest : भीक नको, हक्काचे दुधाला ४० रूपये भाव द्या; दूध परिषदेतून मागणी

Milk Council at Indapur : गाईच्या दुधाला ४० रूपये हमीभावाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी मंगळवारी इंदापूरमध्ये दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळावा, दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने 'संघर्ष सप्ताह'ला सुरूवात केली आहे. याचदरम्यान मंगळवारी (ता.१६) गाईच्या दुधाला ४० रूपये हमीभाव मिळवा या मागणीसाठी दूध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंदापूरमधील महापालिकेसमोर दुपारी १ वाजता दूध परिषद भरणार आहे. तर शिवधर्म फाउंडेशन आणि दूध उत्पादक शेतकरी इंदापूरच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

या दूध परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक तथा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले असतील. तर प्रमुख पाहुणे कुतवळ फुड्स प्रा.लिचे चेअरमन प्रकाश कुतवळ असणार आहेत.

तर या परिषदेतून राज्य सरकारकडे शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रूपये भाव मिळाला पाहिजे. मागील फेब्रुवारी, मार्च २ माहिने व इथून पुढील काळात मिळणाऱ्या दूध अनुदानाचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के मिळाला पाहिजे. सरकारने दूध पावडर व दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी कमी करावा. दूध पावडरला अनुदान देऊन पावडर निर्यात करावी. तर केंद्र सरकाने १० हजार टन पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरित थांबवावा. यासह इतर मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत. त्याचअनुशंगाने या परिषदेतून शेतकऱ्यांना जागृक केले जाणार आहे. तर या परिषदेला परिसरातील अधिका अधिक शेतकऱ्यांनी सामिल व्हावे असेही आवाहन शिवधर्म फाउंडेशन व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केले आहे.

दरम्यान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलनाच्या दुसरा टप्पात कोतुळ येथे सोमवारी (ता.१५) सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. दुधाच्या दरासह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली दूध हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडत सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या.

दूध दर प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी इंदापूर दूध परिषदेत सखोल विचारमंथन केले जाईल. दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंग मान्य करून घेण्यासाठीची लढाई यातून पुढे जाईल. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी परिषदेला उपस्थित राहावे.
-डॉ. अजित नवले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT