Milk Rate : दूध हंडी फोडून सरकारचा निषेध; कोतुळ बंदला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

Milk Producer Farmers Sangharsh Committee : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच दहाव्या दिवशी कोतुळ बंद ठेवून दूध आंदोलनास आपला पाठिंबा दिला.
Milk Rate
Milk RateAgrowon
Published on
Updated on

Pune News : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर 'संघर्ष सप्ताह'ला सुरूवात करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून कोतुळ येथे शेतकऱ्यांकडून गेल्या १० दिवसापासून धरणे आंदोलन केले जात आहे. यावेळी दुधाला ४० रूपये दरासह दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी करण्यात आली. तसेच दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे अशी मागणी करत शेतकऱ्यांनी कोतुळ बाजारपेठ बंद ठेवत दूध हंडी फोडून सरकारचा निषेध नोंदवला.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्याच्या व्यथा कमी होण्याऐवजी वाढत आहेत. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही. तर त्याच्या दुधाची किंमत देखील या सरकारला देणं जमतं नाही. यामुळेच आता दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी 'संघर्ष सप्ताहा'मध्ये कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध केला आहे. तसेच कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधले.

Milk Rate
Milk Rate : संघर्ष समितीच्या 'संघर्ष सप्ताह'ला सुरूवात; कोतुळ बाजारपेठ बंद, दूध हंडी आंदोलन

आंदोलनास्थळी दूध हंडी फोडण्यात आली. यावेळी या आंदोलनास वारकरी संप्रदायाने भरघोस पाठिंबा दिला. अभंग व भजनाच्या निनादांमध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या.

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव मिळाला पाहिजे, दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे, पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. दूध हंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली.

Milk Rate
Milk Rate : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीकडून दूध आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने १५ जुलै ते २१ जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. आज पहिल्याच दिवशी दूध हंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. तर महाराष्ट्रभर विविध पद्धतीने हे आंदोलन पुढे जाणार आहे.

आंदोलनात सदाशिव साबळे, विनोद देशमुख,अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बी.जे. देशमुख, सिताराम देशमुख, राजू देशमुख, बाळासाहेब गीते, विजय वाकचौरे, राजेंद्र गवांदे, गौतम रोकडे, निलेश तळेकर, नामदेव भांगरे, राजाराम गंभीरे, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव यांनी सहभाग घेतला.

दुधाला ४० रूपये भाव द्या अशी मागणी दूध उत्पादकांची आहे. मात्र सरकारने ३० भाव आणि ५ रूपये अनुदान देण्याचा शासन आदेश काढला. मात्र खासगी दूध संघ हा आदेश जुमानत नाहीत. ते सरकारने ठरवलेला दर देण्यास तयार नाहीत. तर ५ रूपये अनुदानाची स्थिती फार वाईट आहे. गेल्या वेळी जाहीर केलेले अनुदान ८० टक्के शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे आता अनुदान नको. शेतकऱ्याच्या दुधाला ४० रूपये भाव द्या.

-डॉ. अजित नवले, नेते, किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com