Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय कर्ब हा राष्ट्रीय चिंतेचा विषय होणे आवश्यक

Organic Carbon : शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट मिळणे आवश्यक असून, त्यामुळे मातीची पत वाढू शकते. शेतीच्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्याची शेतकऱ्यांची क्षमता राहिलेली नाही.

Team Agrowon

Jalna News : शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट मिळणे आवश्यक असून, त्यामुळे मातीची पत वाढू शकते. शेतीच्या संदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्याची शेतकऱ्यांची क्षमता राहिलेली नाही. त्यामुळे सेंद्रिय कर्ब हा राष्ट्रीय चिंतेचा विषय होणे आवश्यक, असल्याचे मत मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्त कृषिरत्न विजयअण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.

खरपुडी येथील कृषी विज्ञान मंडळाचे ३१६ वे मासिक चर्चासत्र व जागतिक मृदा दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. बोराडे बोलत होते.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगरचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार आणि सेंद्रिय शेतीचे अभ्यासक पुणे येथील डॉ. प्रशांत नाईकवाडी यांच्यासह कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. सोनुने यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

श्री बोराडे म्हणाले, की मातीचे व्याख्यान ऐकणे अवघड आहे. मातीतले बारकावे शेतकऱ्यांना माहिती नाहीत असे नाही, पण त्याची हतबलता आहे. माती आणि फुलदार माती यात फरक आहे. तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय आपण का करू शकत नाही, हा संशोधनाचा विषय आहे, असे ते म्हणाले.

श्री. कापसे म्हणाले, की पिकांच्या गरजेनुसार जमिनीतून उपसा झालेली अन्नद्रव्ये परत जमिनीत घालण्याची गरज आहे. अन्न हे मातीतच उगवावे लागेल. नैसर्गिक शेतीत आवश्यक असणारे बदल करणे आवश्यक असून, कृषी विभाग त्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे, असे ते म्हणाले.

मृदा दिनाच्या निमित्ताने आपल्या जमिनीच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या व सर्वाधिक सेंद्रिय कर्ब टिकवून ठेवणाऱ्या जगदीश जाधव, लक्ष्मण कचरे आणि कृषिभूषण रवींद्र गोल्डे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT