Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : पुणे जिल्ह्यातील फळबाग उत्पादक धास्तावले

Agricultural Issues : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाल्याने फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत.

Team Agrowon

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोका निर्माण झाल्याने फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. जिल्ह्यात द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. पाऊस पडल्यास नुकसान होण्याची भीती सध्या शेतकऱ्यांना आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यांच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्याचा परिणाम पिकांवर होत आहे. रब्बीच्या पेरण्या सुरू आहेत. पेरणी झालेल्या मका, ज्वारी, गहू पिकांनाही ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात द्राक्षासह इतर फळपिकांचे सुमारे ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. द्राक्षाचे नारायणगाव, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत मोठे क्षेत्र आहे. सध्या द्राक्ष बागा फुलोऱ्यात तसेच पाणी उतरण्याच्या स्थितीत आहेत. ढगाळ हवामानामुळे

पुरंदर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, बारामती या भागांतील फळबागा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. पाऊस, ढगाळ वातावरणामुळे द्राक्षावर रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी फवारणीचा खर्च वाढ. तसेच या दरम्यान पाऊस झाल्यास घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

...अशी काळजी घ्या

रोगांचा नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशकांची शिफारसीनुसारच फवारणी करावी. वाढीच्या अवस्थेत पिकांकडे विशेष लक्ष द्यावे. हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

गहू, कांदा पिकांना फटका

जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मागील काही दिवसांपासून थंडी असल्याने पिकांना पोषक वातावरण होते. परंतु दोन दिवसांपासून अनेक भागांत कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी कमी थंडी आहे. यामुळे गहू, कांदा पिकांसह भाजीपाल्याच्या पिकांवर परिणाम दिसत आहे. गहू पिकावर रोग-किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

ढगाळ हवामानामुळे द्राक्ष, गहू व हरभरा या पिकांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीनुसार योग्य वेळी फवारणी घ्यावी.
संतोष करंजे, पीक तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT