Orange Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Growers : संत्रा उत्पादक मदतीपासून वंचित

Orange Growers Deprived of Aid : संत्रा उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने त्याबाबत रोष व्यक्त करण्यात येत असून संबंधित विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Team Agrowon

Amravati News : अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी, वरूड, चांदूरबाजार, अचलपूर, तिवसा यांसह विविध तालुक्यांमध्ये हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार संत्राफळांची लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे, तेवढ्याच प्रमाणात तोटाही आहे. परंतु संत्रा उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने त्याबाबत रोष व्यक्त करण्यात येत असून संबंधित विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

पिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल, याकरिता जिल्ह्यातील हजारो संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १३३३ रुपये भरून २०२२-२३ मध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा काढला होता.

या योजनेअंतर्गत आंबिया बहर २०२२- २३ गारपीट या व्यतिरिक्त हवामान धोक्यासाठी राज्याची हिश्‍शाची रक्कम १२ कोटी ४ लाख ९७ हजार ८७८ रुपये वीमा कंपनीस वितरित करण्याबाबत २३ फेब्रुवारी २०२४ रोजी शासननिर्णय काढण्यात आला. परंतु गारपीटग्रस्त फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना गारपीट विमा मदत वितरित करण्यात आली नसल्याचा आरोप राकाँचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळके यांनी केला आहे.

आठ दिवसांमध्ये गारपीटग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा मदत जमा न केल्यास संबंधित कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांना पात्र पाठवून देण्यात आला. संत्रा उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून माहिती विचारण्याचा प्रयत्न करीत असताना विमा कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कंपनीविरोधात रोष निर्माण होताना दिसत आहे.

आंदोलनाचा इशारा

शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीला शासन व विमा कंपनीचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासन व विमा कंपनीला धारेवर धरण्यासाठी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT