Orange Orchard : नियोजनबद्ध संत्रा बाग व्यवस्थापनावर भर

Orange Production : ९ एकरांत संत्रा लागवड आहे. त्यात साधारणपणे १२०० झाडे आहेत. संत्रा लागवडीमधून आंबिया आणि मृग या बहारातून उत्पादन घेतले जाते. साधारणपणे १९६० पासून पोहोकार कुटुंबाने संत्रा उत्पादनामध्ये सातत्य राखले आहे.
Orange Orchard
Orange OrchardAgrowon
Published on
Updated on

Orange Management :

शेतकरी नियोजन
पीक : संत्रा

शेतकरी : किशोर गुणवंत पोहोकार
गाव :जसापूर, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती
शेती : १५ एकर क्षेत्र
संत्रा लागवड : ९ एकर
एकूण झाडे : १२००

जसापूर (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील किशोर गुणवंत पोहोकार यांची वडिलोपार्जित ११ एकर शेती. या शेतीला किशोर यांनी नंतरच्या काळात ४ एकर शेती घेऊन आणखी भर घातली. अशी सध्या त्यांच्याकडे एकूण १५ एकर शेती आहे. खरिपात कपाशी, सोयाबीन तर रब्बी हंगामात हरभरा या सारखी पिके घेतली जातात.

याशिवाय ९ एकरांत संत्रा लागवड आहे. त्यात साधारणपणे १२०० झाडे आहेत. संत्रा लागवडीमधून आंबिया आणि मृग या बहारातून उत्पादन घेतले जाते. साधारणपणे १९६० पासून पोहोकार कुटुंबाने संत्रा उत्पादनामध्ये सातत्य राखले आहे.

प्रतिकूल स्थितीतही राखली उत्पादकता :
हरभऱ्याची उत्पादकता ९ क्‍विंटल इतकी अत्यल्प असताना देखील त्यांनी तंत्रशुद्ध व्यवस्थापनाच्या बळावर गेल्या हंगामात हरभऱ्याची १६ क्‍विंटल उत्पादकता मिळविली आहे. यंदाच्या हंगामात खासगी कंपनीच्या वाण लागवडीतून १५ क्‍विंटल सोयाबीन उत्पादकता मिळाली आहे.

अतिवृष्टी, मॉन्सुनोत्तर पावसाचा फटका बसल्यामुळे सोयाबीन उत्पादकतेवर परिणाम झाला. तरीदेखील योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर सोयाबीनची उत्पादकता १५ क्विंटलपर्यंत राखण्यात किशोर यांना यश मिळाले आहे.

Orange Orchard
Orange Processing Center : संत्रा प्रक्रिया केंद्र निर्मितीला मंजुरीमुळे शेतकरी सुखावला

संत्रा लागवड :
संपूर्ण ९ एकरांतील संत्रा लागवड ही १७ फुट बाय १७ फूट अंतरावर आहे. बागेतील झाडे ही ११ वर्षाची आहेत. सध्या बागेतील साधारण ६०० झाडांवर मृग बहार धरला आहे. तर उर्वरित झाडांवर आंबिया बहर धरण्याचे नियोजित आहे.

मृग बहार नियोजन :
सध्या मृग बहाराची फळे लहान आकाराची असून मार्च महिन्यात ही फळे फळे तोडणीस येतील. यावर्षी झाडांवर मृग बहाराच्या फळांची संख्या नेहमीच्या तुलनेत अधिक दिसून येत आहे.

झाड पूर्णपणे विकसित झाले तर त्यापासून पुढील काळात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण फळे मिळतात. झाडाचे आयुष्य ३५ ते ४० वर्ष इतके असते. मात्र कमी कालावधीत किंवा पूर्ण विकसित न झालेल्या झाडांवर बहार धरून फळ उत्पादन घेतल्यास झाडांचे आयुष्य कमी होते, असा त्यांचा अनुभव आहे.

सिंचन व्यवस्थापन :
सिंचनासाठी शिवारात दोन बोअरवेल घेतल्या आहेत. मृग बहार धरलेल्या लागवडीमध्ये सिंचनासाठी डबल लॅटरल असलेल्या ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. संत्रा झाडांवर सिंचनाच्या पाण्याद्वारे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन रोग नियंत्रणासाठी सिंचनावर व्यवस्थापनावर भर दिला जातो.

जमिनीची वाफसा स्थिती लक्षात घेऊन सिंचन करण्यावर भर दिला जातो. ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्‍यता असल्यास सिंचनामध्ये काही अंतर राखले जाते. तापमान वाढत असल्यास कमी दिवसांच्या अंतराने सिंचन केले जाते. चार ते पाच दिवसांचा खंड या काळात राखला जातो. थंडीच्या कालावधीत १० ते १५ दिवसांच्या अंतराने सिंचन केले जाते.

Orange Orchard
Problem of Orange Area : संत्रा पट्ट्यातील समस्यांबाबत बच्चू कडूंचे शरद पवारांना साकडे

खत व्यवस्थापन :
बागेला एक वर्षाआड संपूर्ण कुजलेले शेणखत दिले जाते. प्रति झाड तीन ते चार टोपली (घमेले) शेणखत मात्रा दिली जाते. प्रति ट्रॉली तीन हजार रुपये दराने शेणखत खरेदी केली जाते. मृग बहाराचे व्यवस्थापन म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात १०ः२६ः२६ आणि निमकेक तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या मात्रा दिल्या जातात. संपूर्ण खतमात्रा ही रिंगण पद्धतीने प्रति झाड दीड किलो प्रमाणे दिली जाते.

मागील महिनाभराचे कामकाज :
- झाडांवर फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे झाडांवर अतिरिक्त भार पडून झाडे कोलमडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडांना काठीच्या साह्याने आधार दिला आहे.
- फळांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रासायनिक फवारण्यांचे घेतल्या.
- त्याशिवाय खोड मजबूत होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर केला आहे.
- फळांचा दर्जा राखण्यासाठी फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला आहे. तसेच जमिनीतून १०ः२६ः२६ च्या मात्रा दिल्या आहेत. खतमात्रा झाडांना रिंग पद्धतीने देण्यात आली.

आगामी नियोजन :
- साधारण ५ जानेवारीच्या दरम्यान बागेला ठिबकद्वारे सिंचन केले जाईल.
- जमिनीत वाफसा आल्यानंतर कोळपणी करण्याचे नियोजित आहे.
- मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता पाहता रासायनिक फवारणीचे नियोजन केले जाईल.
- मृग बहरातील फळे साधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तोडणीस येतील. फळांचा दर्जा आणि गुणवत्ता पाहून व्यापारी जागेवरच फळांची खरेदी करतात. त्यामुळे मजूर लावून फळ तोडणी करावी लागत नाही.

- किशोर पोहोकार, ९४०३०५४२२०, ८९९९२४१८५९
(शब्दांकन : विनोद इंगोले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com