Orange Fruit Fall Agrowon
ॲग्रो विशेष

Orange fruit fall : संत्रा पट्ट्यात पसरली मृगाबाबत अनिश्‍चितता

Orange Crop : पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, आंबिया फळांची गळ सुरू आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. परिणामी, आंबिया फळांची गळ सुरू आहे. त्यासोबतच मे महिन्यात मृग बहरातील फळे घेण्यासाठी ताणावर सोडलेल्या बागांमध्ये पाऊस झाला. त्यामुळे ताण तुटल्याने मृगाबाबतही अनिश्‍चितता निर्माण झाल्याने संत्रापट्ट्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नागपुरी संत्र्याचा बांगलादेश हा एकमेव आयातदार आहे. त्याने देखील आयात शुल्कात प्रतिकिलो ८८ रुपयांची वाढ केल्याने भारतातून होणारी निर्यात प्रभावित झाली आहे. त्यासोबतच वातावरणातील बदलाचा फटकादेखील संत्रा पट्ट्यात बसत आहे. तापमानात होणारी वाढ त्यासोबतच बाग ताणावर असताना येणारा पाऊस यामुळे आंबिया आणि मृग बहर घेणे अडचणीचे ठरत आहे.

सद्यःस्थितीत आंबिया बहरातील फळांचा आकार लिंबापेक्षा मोठा आहे. मात्र तापमानात वाढ झाल्याने याचा फटका बागांना बसत आहे. सध्या तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. यातूनच आंबियाच्या फळांची गळ होत असल्याचे ‘महाऑरेंज’चे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले.

मृग बहरातील फळे घेण्यासाठी मे महिन्यात बाग ताणावर सोडली जाते. या वर्षी मे महिन्यात अनेकदा पावसाने हजेरी लावली. परिणामी, बागेला ताणच बसला नाही. त्याचा परिणाम येत्या काळात उत्पादकतेवर होण्याची भीती वर्तविली जात आहे.

जूनमध्ये १६५ मिमी पाऊस, ७० टक्‍क्यांपेक्षा जास्त आर्द्रता, तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस अशी परिस्थिती बहरासाठी पोषक ठरते. यंदा मे महिन्यात वळवाचा पाऊस झाल्याने अकाली ताण तुटला. मात्र त्यानंतर मे अखेरीस तापमानात वाढ झाल्याने मृग बहर घेणाऱ्यांना त्याचा फायदा झाला, असे असले तरी वातावरणातील बदलाच्या परिणामी मृग बहार लेट होत जूनऐवजी जुलैत फूट येत आहे.
- डॉ. योगेश इंगळे, उद्यानविद्या तज्ज्ञ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
सिंचनाच्या सोयी नसलेले शेतकरी पावसाच्या पाण्यावर मृग बहर घेतात. परिणामी, याचे व्यवस्थापनात अचूकता असावी लागते. त्यामुळेच मृग बहर घेणाऱ्यांची संख्या केवळ ३० टक्‍के, तर आंबिया बहर घेणारे ७० टक्‍के आहेत. वातावरणातील बदलाच्या परिणामी यंदा मे महिन्यात वळवाचा पाऊस झाला. त्यामुळे मृगासाठी ताणावर सोडलेल्या बागांचा अकाली ताण तुटला. त्याचा फटका बसल्याने मृग बहर येणार की नाही याविषयी अनिश्‍चितता आहे.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक महाऑरेंज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT