Sweet Orange Fruit Fall : मोसंबी फळगळीचे पंचनामे करावेत

अंबड, घनसावंगीतील शेतकऱ्यांची मागणी
 Sweet Orange Fruit Fall
Sweet Orange Fruit FallAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अंबड, जि. जालना : मोसंबी फळगळीचे (Sweet Orange Fruit Fall) पंचनामे करून मदत मिळणे विषयी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी (Sweet Orange Producer Farmers) अंबड तहसीलदार यांना सोमवारी (ता. ५) स्मरणपत्र दिले. त्यावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

 Sweet Orange Fruit Fall
बुरशी, अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे संत्रा फळगळ

१० ऑगस्टला मोसंबीचे पंचनामे करून मदत मिळण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर कुठलीही कार्यवाही आपणाकडून अद्यापपर्यंत झालेली नाही. वास्तविक पाहता पिकाचे ३३ टक्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यानंतर प्रशासनाने स्वयंप्रेरणेने पंचनामे करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यामध्ये मंठा, परतूर, भोकरदन, जाफराबाद येथे पंचनामे सुरू आहेत. अंबड, घनसावंगीमध्ये ३३ टक्यांपेक्षाही अधिक नुकसान होऊन देखील मोसंबीच्या फळगळीचे पंचनामे झालेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ठराविक ठिकाणी पंचनाम्याचे आदेश दिले. त्यामुळे अंबड व घनसावंगीमधील मोसंबी उत्पादक शेतकरी वंचित राहू नये, या करिता स्मरणपत्र देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
निवेदन देतेवेळी मोसंबी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. अंबड येथील यशवंत सहकारी सूतगिरणीचे माजी संचालक प्रकाशराव कणके, माजी सरपंच अप्पासाहेब गावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र भागडे, दत्ता खराबे, गंगाराम शिंदे, सुभाष बर्डे, पवन गोरे, पवन पघळ, मच्छिंद्र खराबे, भागवत बागल आदी मोसंबी उत्पादक उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com