Cashew Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Subsidy : काजू अनुदान निर्णयातील जाचक अटी रद्द कराव्यात

Cashew Growers Union Demands : काजू अनुदान निर्णयातील जाचक अटींमुळे या योजनेचा कोणताही लाभ काजू उत्पादकांना मिळणार नाही. त्यामुळे निर्णयातील अटी शिथिल करून सरसकट अनुदान द्यावे.

Team Agrowon

Sindhudurg News : काजू अनुदान निर्णयातील जाचक अटींमुळे या योजनेचा कोणताही लाभ काजू उत्पादकांना मिळणार नाही. त्यामुळे निर्णयातील अटी शिथिल करून सरसकट अनुदान द्यावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काजू बागायतदार संघाने शासनाला दिला आहे.

फळबागायतर संघ आणि जिल्ह्यातील काजू उत्पादकांची बैठक बांदा येथे झाली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, दिवाकर मावळणकर, जनार्दन नाईक, विठ्ठल मुरूडकर, गोपाळ करमळकर, विष्णू सावंत, सुरेश गावडे, प्रकाश दळवी, संजय देसाई, अशोक सावंत, राकेश धर्णे आदी उपस्थित होते.

या बैठकीत काजू अनुदान शासन निर्णयाविषयी चर्चा झाली. शासननिर्णयानुसार शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, सहकारी संस्था, तालुका खरेदी-विक्री संघ आणि काजू प्रकियादार यांच्याकडे काजू बीची विक्री केलेली असावी.

सामाईक क्षेत्राविषयी हमीपत्र, ई-पीक नोंदणी, जीएसटीची पावती यासारख्या जाचक अटी घातलेल्या आहेत. प्रत्यक्षात काजू उत्पादकांनी काजू व्यापाऱ्यांकडे विक्री केलेली आहे. विक्रीची कोणतीही पावती शेतकऱ्यांकडे नसते. सहकारी संस्थांनी काजू खरेदी केलेली नाही. जीएसटीची पावती एकाही शेतकऱ्यांकडे मिळणार नाही.

त्यामुळे या जाचक अटी शासनाने रद्द कराव्यात आणि सरसकट काजू क्षेत्रानुसार उत्पादन निश्चित करून त्यानुसार अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ही मागणी जर शासनाने ३१ जुलैपर्यंत मान्य केली नाही तर १५ ऑगस्टला जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको, तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत काजू उत्पादकांनी घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT