Fruit Crop Insurance : मृग बहार फळपीक विमा योजनेत ई-पीक नोंदणी सक्तीची

E-Crop Registration : मृग बहारातील आठ फळपिकांसाठी राज्य शासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना जाहीर केली आहे.
Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance Agrowon

Pune News : मृग बहारातील आठ फळपिकांसाठी राज्य शासनाने हवामानावर आधारित पीकविमा योजना जाहीर केली आहे. सहभागी शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे. कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेचा लाभ संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळ, द्राक्ष फळबागांना मिळेल.

विमाधारकांच्या फळबागांना कमी पाऊस किंवा अतिपाऊस, पाऊस खंड, सापेक्ष आर्द्रता अशा विविध हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण मिळणार आहे. महसूल मंडलात २० हेक्टरपेक्षा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या मंडलांमध्येच ही योजना लागू आहे.

उत्पादनक्षम वय असलेल्या बागेचाच विमा काढला जाईल. त्यानुसार आंबा, चिकू, काजू बागेचे वय ५ वर्षे, लिंबूसाठी चार वर्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळासाठी तीन वर्षे तर डाळिंब, द्राक्षासाठी वयोमर्यादा दोन वर्षांची आहे.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance : दोन बहरांतील १७ फळपिकांना विमा संरक्षण

विमा योजना भाडेपट्टीने, कुळाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीदेखील उपलब्ध आहे. कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. शेतकरी www.pmfby.gov.in या विमा संकेतस्थळावर स्वतः अर्ज भरू शकतात.

तसेच गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रावर (सीएससी) अर्ज भरता येईल. खोटी कागदपत्रे जोडून अथवा चुकीची माहिती देऊन विमा काढल्यास कडक कारवाई होऊ शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

Fruit Crop Insurance
Fruit Crop Insurance: फळपीक विमा योजनेची संरक्षित रक्कम वाढली

संत्रा, पेरू, लिंबू व द्राक्षासाठी विमा योजनेत सहभागाची अंतिम मुदत २५ जूनपर्यंत आहे. मोसंबी व चिकू ३० जूनपर्यंत, डाळिंब १४ जुलैपर्यंत तर सीताफळाच्या बागेचा विमा ३१ जुलैपर्यंत काढता येईल. फळबागांमध्ये सर्वात जास्त विमा संरक्षण रक्कम द्राक्षासाठी असून ती ३.८० लाख रुपये आहे.

मात्र, त्यासाठी शेतकऱ्याला प्रतिहेक्टरी विमाहप्ता १९ हजार रुपये भरावा लागेल. सर्वात कमी विमा हप्ता पेरू बागेला असून तो हेक्टरी साडेतीन हजार रुपये राहील. त्यामोबदल्यात पेरू बागेला ७० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळेल.

फळपिकांचे जिल्हे, कंत्राट मिळालेल्या कंपन्या ः

- जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरी - भारतीय कृषी विमा कंपनी (एआयसी)

- जालना - फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी

- छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड, नंदुरबार - युनिर्व्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी

- ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलडाणा, नाशिक, नगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशीम - बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com