Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Protest: शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी प्रश्‍नी विरोधकांचा सभात्याग

Opposition Walkout on Farmer Loan Waiver: राज्यात शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीबाबत चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी ही मागणी फेटाळताच आक्रमक झालेल्या विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल, अशी मागणी करत या ज्वलंत प्रश्नावर चर्चा घ्यावी, ही विरोधकांची मागणी अध्यक्षांनी बुधवारी (ता. २) फेटाळून लावल्याने विधानसभेतून विरोधकांनी सभात्याग केला.

या वेळी बबनराव लोणीकर आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचाही समाचार विरोधकांनी घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा नियम ९७ अन्वये शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफीच्या विषयावरील चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र, अध्यक्षांनी तो फेटाळून लावला. या वेळी विषयाची मांडणी करताना वडेट्टीवार यांनी लातूर येथील एका शेतकऱ्याला बैल घेणे जमले नसल्याने तो स्वत: खांद्यावर जू ठेवून औत ओढत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ दिला.

हा विषय ज्वलंत असून सध्या शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. कर्जमाफी नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. या वरून गोंधळ वाढल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाजामध्ये लक्षवेधी सूचना, विरोधकांचा प्रस्ताव आदी आयुधांद्वारे हा विषय तुम्ही मांडू शकता असे सांगून स्थगन नाकारला.

गोंधळादरम्यान शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर चर्चा घेतली पाहिजे, असा आग्रह धरला. त्यामुळे त्यावर चर्चा केली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र अध्यक्ष ठाम राहिले. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. गोंधळातच अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

‘सरकारसाठी लज्जास्पद’

लातूर येथील एका ६५ वर्षीय शेतकऱ्याची ऐपत नसल्याने त्याने बैलाऐवजी स्वतःला औताला जुंपल्याची घटना घडली आहे. हे सरकारसाठी लज्जास्पद असून सरकारने या शेतकऱ्याला मदत द्यावी, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

विरोधकांचा केवळ कांगावा : अजित पवार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रस्ताव द्या. यावर चर्चा घेऊ, असे आश्वासन दिले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या नावावर केवळ राजकारण करीत आहेत, असा आरोप केला. आम्हाला शेतकऱ्यांविषयी कणव आहे, मात्र विरोधक केवळ कांगावा करत आहेत, असा आरोप केला.

‘शक्तिपीठ’ला पैसे. मग शेतकऱ्यांसाठी का नाही?

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी सरकारकडून २० हजार कोटी मंजूर केले जातात. पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत का, असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. औताला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधील ६५ वर्षीय अंबादास पवार या शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला औताला जुंपले. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : आशिया देशांना २०२५ मध्ये हवामान संकटाचा मोठा फटका; उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळामुळे वाढले नुकसान

Fruit Orchard Farming: फळबागकेंद्रित शेतीतून उल्लेखनीय प्रगती

Gold Price : सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे आर्थिक ताण

El Nino Crisis: ‘एल निनो’ आणि कोरडा उपदेश

ZP Health Sub Centre Certification: ‘झेडपी’ची दोन आरोग्य उपकेंद्रे राज्यात अव्वल; सहा केंद्रांना गुणवत्ता दर्जा प्रमाणपत्र

SCROLL FOR NEXT