Maharashtra Assembly Issue: शेतकऱ्यांच्या अवमानावरून विधिमंडळात गदारोळ

Farmer Insult Issue: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्ये केल्याने विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माफीची मागणी केली आणि विधानसभेत गोंधळ केला.
Farmers Respect
Farmers RespectAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: ‘‘कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी,’’ अशी मागणी करत विरोधकांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करत गदारोळ केला.

दरम्यान, आक्रमक झालेले नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. पटोले यांनी राजदंडाला स्पर्श करत गोंधळ घातल्याने त्यांचे दिवसभरासाठी निलंबन करण्यात आले.तसेच आमदार लोणीकर यांच्या विधानाचा संदर्भ देत पटोले यांनी ‘मोदी तुमचे बाप असतील शेतकऱ्यांचे नाहीत’ असे विधान केल्याने सत्ताधारी आक्रमक झाले.

Farmers Respect
Maharashtra Assembly Protest: सत्ताधारी-विरोधकांचे आंदोलन

विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. मात्र अध्यक्षांनी पुढील कामकाज पुकारल्याने आक्रमक झालेल्या विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग करत दिवसभरासाठी कामकाजावर बहिष्कार घातला. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज एकदा तहकूब करावे लागले.

प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर स्थगन प्रस्तावावरील चर्चा फेटाळण्यात आल्यानंतर कृषी दिनाचा संदर्भ देत काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी माणिकराव कोकाटे आणि बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित करत माफी मागण्यात यावी, अशी मागणी केली. पटोले यांच्यासह विजय वडेट्टीवार व इतर सदस्यदेखील आक्रमक झाले.

Farmers Respect
Nana Patole suspension : कॉँग्रेसचे आमदार नाना पटोलेंचं एक दिवसासाठी निलंबन; शेतकऱ्यांच्या अपमानावरून विधानसभेत गोंधळ

पटोले आणि वडेट्टीवार यांनी अध्यक्षांच्या आसनाकडे धाव घेतली. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. या वेळी पटोले यांनी लोणीकर यांच्या विधानाचा संदर्भ देत ‘मोदी तुमचे बाप असतील शेतकऱ्यांचे नाहीत’ असे विधान केले. त्यामुळे सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. विधान सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज पाच मिनिटांकरिता तहकूब केले.

मुख्यमंत्र्यांचा पटोलेंवर पलटवार

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतरही विरोधक मागणीवर ठामच होते. पटोले पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले. एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणे वेगळे व थेट अध्यक्षांवर धावून जाणे हे चुकीचे आहे.

जणू अध्यक्षच दोषी आहेत, अशा पद्धतीने पटोले धावून गेले हे आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत. ही पद्धत अतिशय अयोग्य आहे. पटोले हे स्वत: अध्यक्ष राहिले आहेत, त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. अध्यक्षांवर धावून जाणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पटोले दिवसभराकरिता निलंबित

विधान सभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मला पुढची कारवाई करण्यास बाध्य करू नका असे नार्वेकर म्हणाले. मात्र पटोले यांचा आक्रमकपणा कायम राहिल्याने अध्यक्ष नार्वेकर यांनी त्यांना दिवसभराच्या कामकाजातून निलंबित केले. यानंतरही विरोधक आक्रमक झाले. विजय वडेट्टीवार यांच्यासह अन्य सदस्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पुढील कामकाज पुकारल्याने विरोधी पक्षांनी त्याचा निषेध नोंदवत दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार घातला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com