Maharashtra Assembly Session agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Session : 'स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी', विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका

Farmers Issue : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Government : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजच्या दिवसातील अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वीच विरोधकांनी विधीमंडळाच्या दारात राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांच्या विविध मुद्यावर सगळ्यांचे लक्ष वेधले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत 'कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा' म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, अस्लम शेख यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले.

गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला महायुती सरकार अदानीच्या खिशाला, कोणी निंदा कोणी वंदा भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा, मुंबई को किसको बेचा अदानी को बेचा, भ्रष्टाचारात नंबर वन महायुती सरकार आणखी कोण, स्मार्ट मीटर कुणासाठी अदानीच्या फायद्यासाठी, गरिबी शेतकऱ्याच्या उश्याला महायुती सरकार अदानीच्या खिशाला अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दरम्यान अर्थसंकल्पावरील सुनावणीवर आजचा दुसरा दिवस असल्याने विरोधकांनी सकाळपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. लाडकी बहीण योजनेतील नियम अटींवरून मागचे दोन दिवस विधिमंडळात गोंधळ सुरू आहे. तर काल राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे ५ दिवसांसाठी निलंबण करण्यात आल्याने आज यावर जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.

दुधाला ३५ रूपये भाव देण्याचा निर्णय

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी आणि बटरचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदी दरावर परिणाम झाला होता. यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दुधाला प्रतिलिटर ३० रुपये स्थायीभाव आणि शासनाकडून ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुधाचे नवीन दर दि. १ जुलै पासून लागू होतील. याबाबतचे निवेदन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT