Gokul Milk Rate : ‘गोकुळ’च्या गाय दूध विक्रीत दोन रुपयांची वाढ

Cow Milk Rate : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने मुंबई आणि पुणे येथे विक्री होणाऱ्या गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली.
Gokul Milk Sangh
Gokul Milk Sanghagrowon
Published on
Updated on

Milk Rate Mumbai Pune : राज्यातील सर्वच सहकारी आणि खासगी दूध संघांनी गाय दूध दरात वाढ केली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने मुंबई आणि पुणे येथे विक्री होणाऱ्या गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे, पूर्वी प्रतिलिटर गाय दूध ५४ रुपयेला विक्री होत होते. आजपासून हाच दूध दर ५६ रुपये झाला असल्याचे परिपत्रक काढले आहे.

‘गोकुळ’च्या गाय दुधाची मुंबईमध्ये तीन लाख लिटर आणि पुण्यात ४० हजार लिटरची विक्री होते. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणाऱ्या संघांना या दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, मुंबई व पुणे येथे ‘गोकुळ’च्या चांगल्या आणि दर्जेदार दुधाला मोठी मागणी आहे. इतर संघांनी विक्री दर वाढवला असतानाही ‘गोकुळ’ने काही दिवस आपले दर कमीच ठेवले होते. दरम्यान, वाढता खर्च आणि दूध पावडरीमधील होणाऱ्या तोट्याचा ताळमेळ घालण्यासाठी सध्या वाढलेल्या दरामुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे.

राज्यातील सर्वच दूध संघांनी दरवाढ केल्यानंतर ‘गोकुळ’नेही दरवाढ करावी, अशी चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत झाली होती. त्यानुसार कालपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दरवाढीमुळे दूध विक्रीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे दूध विक्री सुरू असून आणखी दुधाला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Gokul Milk Sangh
Raju Shetti On Milk Rate : राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात नगरमध्ये जोरदार आंदोलन; ४० रू दर देण्याची मागणी

गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे म्हणाले की, ‘राज्यातील सर्व दूध संघांनी मुंबई आणि पुण्यातील गाय दूध विक्रीचे दर वाढवले आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’नेही प्रतिलिटर दोन रुपये दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार तो लागू केला आहे.

गोकुळ दूध संघाची मुंबई शहरात ३ लाख लिटर दूधाची विक्री होते पूर्वीचा दर ५४ रूपये होता तो आता ५६ रूपये करण्यात आला आहे. तर पुणे शहरात ४० हजार लिटर दुधाची विक्री होते पूर्वी ५४ रूपये असलेला दर आता ५६ रूपये करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com