Maharashtra Tissue Culture Subsidy Scheme: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षात क्षेत्र विस्तार कार्यक्रमामध्ये नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. या घटकांतर्गत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन घटकांतर्गत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे..सार्वजनिक क्षेत्रातील कृषी विद्यापीठे, इतर शासन अंगीकृत संस्था आणि शासकीय प्रक्षेत्रांना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या १०० टक्के, जास्तीत जास्त अडीच कोटी रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राच्या आधारे मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे आवश्यक आहे. आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांनाच नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा मंजूर करण्यात येईल..Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया.खासगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी प्रकल्प मूल्याच्या ४० टक्के, जास्तीत जास्त एक कोटी रुपयांपर्यंत प्रति प्रयोगशाळा अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. हा प्रकल्प बँक कर्जाशी निगडित असणे आवश्यक आहे. तसेच प्रयोगशाळेने मान्यता असलेल्या पिकांची किमान २५ लाख रोपे उत्पादित करणे आवश्यक आहे..Gaushala Subsidy Scheme: गोशाळांना ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत.उती संवर्धन प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाच्या मानके व निकषांनुसार अनुदान मिळाल्यापासून १८ महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक राहील. सार्वजनिक उपक्रमांसाठी, म्हणजेच कृषी विद्यापीठे, सार्वजनिक संस्था व शासकीय प्रक्षेत्रांसाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा अडीच कोटी रुपये असून, अनुदानाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के आहे. खासगी क्षेत्रासाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा एक कोटी रुपये असून, अनुदानाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या ४० टक्के आहे..नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी महाडीबीटी पोर्टलवरील फलोत्पादन घटकांतर्गत अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शाह यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.