Maharashtra Budget : 'माझी लाडकी बहीण योजने'साठी कोणत्या महिला असणार पात्र? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक वर्ष २०२२४-२५ चा अतिरिक्त अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon

अर्थमंत्री

अजित पवार यांनी आपल्या अर्थमंत्री म्हणून १० व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon

शेतकऱ्यांसाठी घोषणा

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon

महिलांसाठी योजना

मध्यप्रदेशच्या धरतीवर महाराष्ट्रात माझी बहीण लाडकी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon

दरमहा १५०० रुपये

या योजनेंतर्गत राज्यातील २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon

४६ हजार कोटींची तरतूद

या योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्यातील २१ ते ६० वर्षे वयोगटातील महिला पात्र असणार आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon

वार्षिक उत्पन्न

वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार ५०० रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Mazi Ladki Bahin Yojana | Agrowon