Fish Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Farming : शेततळ्यातील मत्स्यपालनास संधी

Fisheries : शेततळ्यांत योग्य प्रमाणात उच्च प्रतीचे मत्स्यबीज सोडून हवायुक्त पाणी, माशांचा आहार व विक्रीचे नियोजन करून शात्रोक्त मत्स्यपालन करावे.

Team Agrowon

Jalna News : जिल्ह्यात शेततळ्यातील मत्स्यपालनास मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरअंतर्गत उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. सोमनाथ यादव यांनी केले.

खरपुडी येथे शनिवारी (ता. ५) आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या मासिक चर्चासत्राप्रसंगी ‘शेततळ्यातील मत्स्यपालन’ या विषयावर डॉ. यादव बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे तर सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त जमील शेख, जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, शात्रज्ञ डॉ. हुमायून शरीफ, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची उपस्थिती होती.

डॉ. यादव म्हणाले, की राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि मागेल त्याला शेततळे या योजनांमार्फत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शेततळी निर्माण झाली. शेततळ्यांत योग्य प्रमाणात उच्च प्रतीचे मत्स्यबीज सोडून हवायुक्त पाणी, माशांचा आहार व विक्रीचे नियोजन करून शात्रोक्त मत्स्यपालन करावे. शेततळ्यांतील मत्स्यपालनासाठी इंडीयन कार्प, रोहू, कटला, मृगळ, पंगासीस तसेच तीलापिया या विदेशी जातींचा वापर करावा.

सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त जमील शेख यांनी या वेळी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शरीफ म्हणाले, की रेशीम अळीने कोष न करणे हा प्रश्न महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादन घेणाऱ्या बहुतेक शेतकऱ्यांकडे असल्याचे मत डॉ. शरीफ म्हणाले.

मागील तीन वर्षांपासून हा प्रश्न येत आहे. अळी चौथा मोल्ट टाकेपर्यंत चांगली वाढते, पाचव्या अवस्थेत ६ ते ७ दिवस पाला चांगला खाते, नंतर अळी पक्व होते, पाला खाणे कमी होते, परंतु अळी धागा टाकत नाही. अळी १० दिवसांपर्यंत तशीच राहते व थोडा पाला खाते.

अळी शेवटपर्यंत कोष करत नाही किंवा केला तरी काही प्रमाणात करते. सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या फवारण्या व हवेतील आर्द्रता यामुळे अळीच्या शरीरात हैड्रोप्रिन घटक तयार होतो आणि त्यामुळे कोष तयार होत नाहीत किंवा लहान राहतात, असे ते म्हणाले.

समारोपीय मार्गदर्शनात डॉ. तुकाराम मोटे म्हणाले, की हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी मत्स्यपालन आणि रेशीम उद्योग या जोड व्यवसायांचा शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करावा. याप्रसंगी काही मत्स्यपालक आणि शेतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT