B.Sc Community Science Agrowon
ॲग्रो विशेष

Community Science Course : सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी

Community Science Course Information : महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांपैकी केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे सामुदायिक विज्ञान हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाप्रमाणेच कृषी विषयांतर्गत असणारा सामुदायिक विज्ञान हा चार वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.

Team Agrowon

डॉ. जया बंगाळे

B.Sc in Community Science

प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता

विद्यार्थ्यांने इयत्ता बारावी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा याबरोबर सक्षम विभागाकडून आयोजित करण्यात आलेली एमएचटी सीईटी/ जेईई/ नीट सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे.

या अभ्यासक्रमासाठी मुला- मुलींना प्रवेश खुला असून शासनाने जाहीर केलेल्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना दिला जातो. विद्यार्थ्यांनीना शुल्काच्या बाबतीत असणाऱ्या सर्व सवलती लागू आहेत.

करिअर संधी

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात आल्याने लहान बालकांच्या शिक्षणाला विशेष महत्त्व आले आहे. सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमात पूर्व प्राथमिक शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांना पारंगत केले जात असल्याने त्यांना या क्षेत्रात करिअर संधी उपलब्ध आहेत.

जिल्हा रुग्णालय, दवाखाना, क्रीडा कार्यालय, व्यायामशाळा, केंद्रीय राखीव पोलिस दल, रेल्वे विभाग इत्यादी ठिकाणी आहारतज्ज्ञ याबरोबरच महाराष्ट्र महिला व बाल विकास अधिकारी, आयसीडीएस पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, प्रशासकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बिहेव्हीयर मॅाडिफिकेशन थेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, बँक, भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, आयसीएमआर- एन आय एन इत्यादीमध्ये शासकीय, निमशासकीय तसेच खासगी स्तरावरील विविध योजना, संस्थामध्ये कार्य करण्याची संधी आहे.

अभ्यासक्रमात ‘स्किल इंडिया मिशन’ला अनुसरून ‘स्टार्टअप’ला भरपूर वाव आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या दर्जेदार पूर्व प्राथमिक शाळा, पाळणाघर, आहार सल्ला केंद्र, बाल मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र, इंटेरियर डिझायनिंग, बेकरी आणि कन्फेक्शनरी युनिट, कॅन्टीन, मेस, बुटीक, हॅन्डीक्राप्टस युनिट, इव्हेन्ट मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग यासारखे व्यवसाय सुरु करण्यासाठी सक्षम केले जाते.

अन्न प्रक्रिया आणि साठवणूक, हेल्थ क्लब, लॅन्डस्केप प्लॅनिंग, फर्निचर डिझायनिंग, निवासस्थान, व्यावसायिक संस्था व दवाखाने, मॉल आदींसाठी गार्डन डिझायनिंग, पुष्प रचना, पुष्पगुच्छ निर्मिती, गिफ्ट पॅकेजिंग, इको टुरिझम, बालकांसाठी शैक्षणिक साहित्य व खेळणी निर्माण, हाऊस कीपिंग, पत्रकारिता, व्हिडिओग्राफी, कंपनीमध्ये पब्लिक रिलेशन ऑफिसर तथा मार्केटिंग यासारख्या अभिनव क्षेत्रात विद्यार्थ्यांना करियरच्या मोठ्या संधी आहेत.

स्वायत्त व आंतरराष्ट्रीय संस्थामधील संधी

किशोर न्यायालय (JJB), केंद्रीय समाज कल्याण मंडळ, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), राष्ट्रीय सहकार्य व बालविकास संस्था (NIPCCD), युनिसेफ, युएनडीपी, युएसडी, एफएओ, डब्ल्युएचओ यासारख्या संस्थांमध्ये करिअर संधी आहेत.

आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करण्यास वाव

आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे केअर होम’ तथा त्यांच्या स्वत:च्या घरीच त्यांच्या घ्यावयाच्या काळजी विषयक सेवा, कुटुंबातील दिव्यांग बालके/व्यक्ती यांच्यासाठी विशेष सेवा आणि इंटरव्हेन्शन यासारख्या आव्हानात्मक क्षेत्रातही विद्यार्थी आपले करिअर घडवण्याबरोबरच समाजाला अतिशय निकड असलेल्या सेवा प्रदान करून शकतात.

आजच्या स्पर्धात्मक युगात नोकरी,व्यवसाय तसेच वैयक्तिक जीवनात आनंदी, यशस्वी होण्यासाठी आवश्यक जीवन कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स विकसित करण्याकरिता या अभ्यासक्रमास महत्त्व आहे.

उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांतील संधी

अभ्यासक्रमाचे पदवीधर एमबीएसाठी पात्र असून त्यांना नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट या संस्थेतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन पदव्युत्तर अभ्यासक्रम या व्यतिरिक्त त्यांच्या आवडीच्या विषयात जसे की , स्पेशल एज्युकेटर, स्पीच थेरपी, बाल व कौटुंबिक समुपदेशन, इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, स्कूल कॉउन्सलर इत्यादी डिप्लोमा अभ्यासक्रम करुनही करिअर घडविण्याच्या संधी आहेत.

अभ्यासक्रमाचे पदवीधर एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील पात्र आहेत. या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून दिवसेंदिवस विद्यार्थ्यांसाठी नोकरी, व्यवसायाच्या कक्षा रुंदावत आहेत.

वेबसाइट : http:// www.mcaer.org

-डॉ. जया बंगाळे, ७५८८०८२०५६

(सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT