Animal Science Course : पशू विज्ञान अभ्यासक्रमात ‘पोल्ट्री विज्ञान’ येणार

Poultry Science : पशुवैद्यक’च्या शिफारशीला मान्यता मिळणार
Poultry Management
Poultry ManagementAgrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले

MAFSU : देशाच्या विकासदर (जीडीपी) वाढीसह रोजगार निर्मितीत पोल्ट्री क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच पशू विज्ञान अभ्यासक्रमात यासाठी स्वतंत्र विभाग असावा, अशी शिफारस भारतीय पशुवैद्यक परिषदेने केंद्र सरकारला केली आहे. त्यामुळे देशभरातील पशू विज्ञान विद्यापीठांमध्ये स्वतंत्र पोल्ट्री शाखा अस्तित्वात येणार आहे.

देशभरात १९९४ पर्यंत कुक्‍कुटपालन शास्त्र विभाग स्वतंत्र होता. भारतीय पशुवैद्यक परिषद १९९४-९५ मध्ये अस्तित्वात आली. त्या वेळच्या पशुवैद्यक परिषदेच्या शिफारशीवरून पोल्ट्री विज्ञान विभाग बंद करण्यात आला. त्याऐवजी ‘लाइव्ह स्टॉक प्रॉडक्‍शन ॲण्ड मॅनेजमेंट’ (पशू उत्पादन विभाग) यामध्ये हा विभाग घेतला गेला. या शाखेत गाय, म्हशी, कोंबड्या अशा सर्वांचा समावेश होतो.

Poultry Management
Agriculture Science Center : कृषी विज्ञान केंद्राची कार्यक्षमता वाढविण्याकरिता सूचना कराव्या

दरम्यान, पोल्ट्री आणि डेअरी क्षेत्राचे वर्चस्व वाढले. त्यातूनच देशभरातील विविध पशू विज्ञान विद्यापीठांतून उत्तीर्ण होणाऱ्या १०० पैकी ३५ ते ४० टक्‍के मुलांच्या नोकरीची सोय पोल्ट्री क्षेत्रामधूनच होत असल्याचे देखील निरीक्षण आहे.

त्यामुळेच रोजगाराचा सक्षम पर्याय पोल्ट्री क्षेत्र ठरल्याचे सिद्ध होते. देशाच्या विकासदरातही पोल्ट्री क्षेत्राचे १ ते २ टक्‍के योगदान राहते. या सर्व बाबींची दखल घेत भारतीय पशुवैद्यक परिषदेने पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात स्वतंत्र पोल्ट्री शाखा असावी, अशी शिफारस केली. लवकरच या प्रस्तावाला मान्यता मिळेल. त्यामुळे पोल्ट्री क्षेत्राशी निगडित बारकावे विद्यार्थ्यांना जाणून घेता येतील.

कुक्‍कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये टर्की, बटेर (लावी), बदक, इमू, शहामृग या पक्ष्यांचा समावेश होतो. स्वतंत्र विभागामुळे या पक्ष्यांवर अभ्यास आणि संशोधन होईल. पोल्ट्री विज्ञानात एनाटॉमी (शरीर रचनाशास्त्र), फिसीऑलॉजी (शरीर विज्ञान), औषधशास्त्र, पॅथॉलॉजी (रोगनिदानशास्त्र) यासह १८ विषयांचा समावेश आहे. पोल्ट्री विज्ञान ही स्वतंत्र शाखा अस्तित्वात आल्यास हे सर्व विद्यार्थ्यांना शिकता येईल.

- डॉ. मुकुंद कदम, प्रमुख,
कुक्‍कुटशास्त्र विभाग, माफसू, नागपूर

जबलपूर (मध्य प्रदेश), बंगलोर (कर्नाटक), हैदराबाद (तेलंगणा) येथील प्रत्येकी एकाच महाविद्यालयात पोल्ट्री विज्ञान आहे. माफसूमध्ये देखील स्वतंत्र शाखा आहे. मात्र जीडीपी आणि रोजगार निर्मितीमधील योगदान लक्षात घेता पशू विज्ञान विद्यापीठांमध्ये पोल्ट्री विज्ञान विभाग असावा. त्यानुसार केंद्राकडे शिफारस केली. लवकरच याला मान्यता मिळेल.

- डॉ. संदीप इंगळे, संचालक, भारतीय पशुवैद्यक परिषद, दिल्ली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com