Latur News: पारंपरिक रब्बी पिकांना फाटा देत काही शेतकरी शेतीत नवनवेन प्रयोग करत असून रब्बीमध्ये काही शेतकऱ्यांनी हरभरा पिकास पर्यायी पीक म्हणून राजमा पीक लागवडीचा प्रयोग केला आहे. जळकोट तालुक्यातील होकर्णा येथील शेतकरी सत्यम कंगळे यांनी यंदा राजमा पिकाची लागवड केली असून सध्या पीक बहरले आहे..लागवडीसाठी राजमाचे एकरी ३० किलो बियाणे लागते. राजमा पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे, पिकाला वन्यप्राण्यांचा त्रास नाही. दुसरे म्हणजे कमी पाणी लागते. ७५ ते ८० दिवसांत पीक काढणीस येते. पिकाचे एकरी उत्पादन सात क्विंटलच्या वर येते. राजमा पिकामध्ये अनेक जाती आहेत. कंगळे यांनी वरून नावाची जात निवडली होती. .Crop Harvesting Experiment: शेतकऱ्यांच्या नजरा आता पीक कापणी प्रयोगाकडे.सोयाबीन पिकासारखा सरळ वाण असल्यामुळे बियाणे आपल्या घरच्या घरी तयार करून पुढल्या वर्षी सुद्धा तेच बियाणे पेरता येते. परिसरातील शेतकऱ्यांनी एखादा गट तयार करून सामूहिक पद्धतीने या वाणाची लागवड केल्यास मार्केटसुद्धा मिळेल, असे शेतकरी सांगतात. दरम्यान, होकर्णा येथील रमाकांत मारोती भुरे, रामेश्वर डोनगावे, शिवशंकर डोणगावे, संभाजी डोनगावे, माधव तगडमपले, मलिकार्जुन भुरे, दिगंबर पाटिल, मारुती ताटफळे यांनीही राजमाचे पीक घेतल्याचे कंगळे यांनी सांगितले..Crop Cutting Experiment: कापणी प्रयोगात विक्रीयोग्य सोयाबीनचे वजन ग्राह्य धरा.महाराष्ट्रात या पिकाची लागवड तीनही हंगामांत होते. हरभरा पिकास मर जास्त लागत असल्यामुळे राजमा पर्यायी पीक ठरत आहे.-एस.आर. पाटील, तालुका कृषी अधिकारी, जळकोट.माझ्याकडे तीन एकर राजमाचे पीक आहे. कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक असून कमी पाण्यावर येते. दोन फवारण्या केल्यास चांगले पीक आहे. चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.-सत्यम कंगळे, शेतकरी.वांजरवाडा परिसरातील शेतकरी राजमा पिकाकडे वळत आहेत. फुले राजमा ७० दिवसांत तयार होणारी जात तर फुले विराज ८५ दिवसांत तयार होणारी जात आहे.-विशाल इंगळे, कृषी सहायक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.