S Jayshankar Agrowon
ॲग्रो विशेष

India China Relation: भारत-चीनमध्ये हवा खुला संवाद : एस. जयशंकर

External Affairs Minister S. Jaishankar: ‘‘सध्याच्या जागतिक संदर्भातील गुंतागुंतीचा विचार करता भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील खुला संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे,’’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

Team Agrowon

Beijing News: ‘‘सध्याच्या जागतिक संदर्भातील गुंतागुंतीचा विचार करता भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील खुला संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे,’’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

चीन दौऱ्यावर उपाध्यक्ष हॅन झेंग यांच्याशी जयशंकर यांनी चर्चा केली. त्या वेळी जयशंकर यांनी ही भूमिका मांडली आहे. ‘‘खुला आणि सातत्यपूर्ण संवाद दोन्ही राष्ट्रांसाठी फायद्याचा ठरेल,’’ असेही जयशंकर म्हणाले.

जयशंकर दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात सिंगापूरहून बीजिंगमध्ये पोहोचले. त्यानंतर त्यांनी उपाध्यक्ष झेंग यांच्याशी चर्चा केली. जयशंकर हे चीनमधील टियांजिन शहरात होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनात सहभागी होण्यासाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. २०२० मध्ये भारत-चीन लष्करामध्ये झालेल्या संघर्षानंतरचा जयशंकर यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे.

जयशंकर म्हणाले, ‘‘गेल्या ऑक्टोबरमध्ये काझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाल्यानंतर आपल्यातील द्विपक्षीय संबंध सातत्याने सुधारत आहेत. माझ्या या दौऱ्यामधूनही निश्चित काही सकारात्मक घडणार आहे. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झाली ही अत्यंत सकारात्मक आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.

आपले संबंध सातत्याने सामान्य पातळीवर राहिले, तर त्यातून दोन्ही देशांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होत चालली आहे. प्रमुख अर्थव्यवस्था या नात्याने भारत आणि चीन यांच्यात खुलेपणाने देवाणघेवाण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचे भाव दबावातच; टोमॅटो दरात सुधारणा, मेथीचा भाव टिकून, बटाटा आणि डाळिंबाला उठाव कायम

Papaya Harvesting : खानदेशात आगाप पपई काढणीवर

Nagpur APMC Corruption: नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा! विधानसभेत मागणी, मंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन

Cotton Procurement : अकोटमधील कापूस खरेदीतील अनियमितेच्या चौकशीसाठी समिती

Urea Demand : बुलडाण्यात युरियाची मागणी वाढली

SCROLL FOR NEXT