Pune News: बंगालच्या उपसागरामध्ये घोंगावत असलेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. आज (ता. २८) हे तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. सांयकाळनंतर ही तीव्र वादळी प्रणाली जोरदार वारे आणि मुसळधार पावसासह काकिनाडाजवळ पूर्व किनाऱ्याला धडकून जमिनीवर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. .या चक्रीवादळाचा विदर्भात प्रभाव राहणार असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात अंदमान समुद्र आणि परिसरावरील वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) तीव्रता वाढल्याने सोमवारी (ता. २७) ‘मोंथा’ चक्रीवादळाची निर्मिती झाली..Montha Cyclone : विदर्भात दोन दिवस चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज.या प्रणालीचे केंद्र ताशी १५ किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे. चक्रीवादळामुळे या भागात ताशी ७५ ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, मंगळवारपर्यंत (ता. २८) वाऱ्यांच्या झोतांचा वेग ११० किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. काही काळ पश्चिमेकडे सरकून ही प्रणाली वायव्य आणि उत्तर दिशेकडे वळणार आहे..सोमवारी (ता. २७) दुपारी ही प्रणाली चेन्नईपासून ५६० किलोमीटर पूर्वेकडे, काकिनाडापासून ६२० किलोमीटर, विशाखापट्टणमपासून ६५० किलोमीटर दक्षिणेकडे, ओडिशाच्या गोपालपूरपासून ७९० किलोमीटर दक्षिणेकडे, तर अंदमानातील पोर्ट ब्लेअरपासून ८१० किलोमीटर पश्चिमेकडे होती. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, आज (ता. २८) सायंकाळनंतर तीव्र चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या मच्छलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमदरम्यान काकिनाडाजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे..Heavy Rain Forecast : राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम.मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा‘मोंथा’ तीव्र चक्रीवादळ किनारपट्टीजवळ येताच ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची, मुसळधार वादळी पावसाची तसेच समुद्र खवळून एक मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. यामुळे सखल भागात पाणी साचून, रस्ते वाहतूक, जनजीवन विस्कळित होणार आहे. मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे..अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली कायमपूर्व-मध्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) कायम असून, ही प्रणाली काहीशी आग्नेयेकडे सरकून याच परिसरात सक्रिय राहणार आहे. सोमवारी (ता. २७) या प्रणालीचे केंद्र मुंबईपासून ८१० किलोमीटर नैर्ऋत्येकडे, गोव्याच्या पणजीपासून ७९० किलोमीटर पश्चिमेकडे, कर्नाटकच्या मंगलोरपासून ९४० किलोमीटर वायव्येकडे होते. या प्रणालीपासून मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.