Rice Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Sowing : रत्नागिरीत भाताच्या अवघ्या पंधरा टक्केच पेरण्या

Kharif Season : वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे.

Team Agrowon

Ratnagiri Sowing News : वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेळापत्रक बिघडणार आहे. पहिल्या पंधरवड्यात भात शेतीच्या रोपवाटिकेसाठी अवघ्या दहा ते पंधरा टक्केच पेरण्या झाल्या असून अनेकांना अद्याप पावसाची प्रतीक्षाच आहे. धूळपेरणीसह काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल अशा आशेने पेरण्या केल्या आहेत. त्यांना बियाणे रुजून येण्याची चिंता सतावत आहे.

जिल्ह्यात गुरुवारपर्यंतच्या (ता. १५) पहिल्या पंधरवड्यात सरासरी १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी आतापर्यंत ९४.४४ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा मोसमी पावसाच्या सुरुवातीलाच अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातून हे वादळ गुजरातकडे सरकले आहे.

त्यानंतर वाऱ्याचा वेग मंदावला आणि कोकणात पावसाचा जोरही कमी झाला आहे. मागील दोन दिवसांत हलक्या सरी काही तालुक्यांत पडल्या. पण त्याचा सर्वच गावांना उपयोग झालेला नाही. खरीप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते.

रोपवाटिकांसाठी सात हजार हेक्टरवर पेरण्या होतात. ७ ते १० जून या कालावधीत बहुसंख्य शेतकरी पेरणीची कामे पूर्ण करतात. यंदा पावसामुळे पेरण्या रखडल्या आहेत. धूळपेरण्या आणि दोन दिवसांपूर्वी ज्या भागात हलका पाऊस झाला तेथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत.

हे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत आहे. पेरण्या उशिरा झाल्यामुळे भात लागवडीला दहा दिवस उशीर होई,ल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

संगमेश्‍वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकरी संतोष भडवळकर म्हणाले, की आम्ही धूळपेरण्या केल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी थोडा पाऊस झाला होता. आता पावसाने पाठ फिरवली असून कडकडीत ऊन पडले आहे. परिणामी पेरलेले बियाणे रुजून किती येईल याबाबत आम्हाला शंका आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे म्हणाल्या, की पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल. पेरणीनंतर २१ दिवसांनी रोपांची लागवड केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT