Dudhana Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सोमठाणा येथील दुधना मध्यम प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक

Team Agrowon

Badanapur News : बदनापूर तालुका आणि नैसर्गिक आपत्ती जणू काही समीकरणच झाले आहे. यावर्षी पुन्हा पावसाने पाठ फिरविल्याने जलस्रोतांमध्ये जेमतेम पाणी आहे. त्यामुळे भविष्यातील टंचाईचे मळभ अधिक घट्ट होताना दिसून येत आहेत. पावसाळा संपत आला, तरी तालुक्यातील महत्त्वाकांक्षी सोमठाणा येथील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने यंदा हा प्रकल्प भरण्याची शक्यता मावळत चालली आहे.

तालुक्याला सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या काळात अतिवृष्टी, तर त्यानंतर कोरड्या दुष्काळाचा मारा तालुक्यावर झाला आहे. यावर्षी तालुक्यात जेमतेम पाऊस झाला. त्याची नोंद सरकारी दफ्तरी झाली खरी. मात्र, प्रत्यक्षात जोरदार पावसाअभावी तालुक्यातील जलस्रोत तहानलेलेच आहेत.

सद्यःपरिस्थितीत खरीप पिके वाळत चालली असून, काही पिकांची माना टाकल्या आहेत. मात्र, त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे आगामी काळात सोसावी लागणारी पाण्याची टंचाईची परिस्थिती होय. तालुक्यातील लघू सिंचन प्रकल्पांत जेमतेम पाणी आहे. मात्र, बदनापूर शहरासह तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या दुधना अप्पर मध्यम प्रकल्पात आजघडीला मृत जलसाठा शिल्लक आहे, अशी माहिती दुधना प्रकल्पाचे मोजणीदार पी.के. गुसिंगे यांनी दिली.

वास्तविक बदनापूर तालुक्यात पावसाळा संपला, तरी टंचाईची परिस्थिती कायम आहे. आजही काही गावे टँकर सुरू ठेवण्याबाबत मागणी करीत आहेत. त्यात आता पावसाळा जवळपास संपला. त्यामुळे जोरदार पाऊस होऊन सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, अशी शक्यता राहिलेली नाही.

दुधना अप्पर मध्यम प्रकल्पात काही दिवसांपूर्वी भिजपाऊस झाल्याने पाण्याचा ओघ सुरू झाला होता. मात्र, दुर्दैवाने पुन्हा पाऊस बंद झाल्याने दुसरीकडून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला आहे. त्यामुळे तलावात मृत जलसाठा शिल्लक आहे. त्याची मोजणीदेखील करता येत नाही.
— पी.के. गुसिंगे, मोजणीदार, दुधना अप्पर मध्यम प्रकल्प, सोमठाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Bajarbhav : सोयाबीनला ६ हजार भाव देणं सरकारला शक्य; सरकारने १३ हजार कोटी खर्च केले तर सोयाबीनला ६ हजार भाव मिळेल

Chemical Fertilizer : रासायनिक खतांची लिकिंगसह खरेदी बंद

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी

Nar-Par Valley : ‘नार-पार’मधील वाहून जाणारे पाणी करंजवण प्रकल्पात

SCROLL FOR NEXT