Nashik News : अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने जलस्रोतांना पाणी आले नसून गावोगावच्या नळपाणी योजनादेखील सक्रिय झालेल्या नाहीत. अर्थात, पिण्यासाठी पाणीयोजनेसह विहिरी, कूपनलिकांना तात्पुरते जीवदान मिळाले असले तरी अद्यापही टंचाईचे ढग कायमच आहेत. सध्या उपलब्ध पाण्यामुळे सोळा महिन्यांनंतर मात्र टॅंकरला विश्रांती मिळाल्याचे समाधान आहे.
ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या तालुक्यात मागील वर्षी पर्जन्यमानाने धोका दिला आहे. अवघा ४२५ मिलिमीटर पाऊस पडला होता, त्यामुळे तालुक्यात खरिपाचा वणवा पेटून पालापाचोळा झाला होता. दोन वर्षात भूजल पातळीत मोठी घट झाल्याने पूर्ण पावसाळ्यात विहिरींना पाणी उतरले नसल्याने याचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर जाणवत आहे.
दोन वर्षात अत्यल्प पाऊस अन वाढत्या उष्णतेबरोबर तळपत्या सूर्याने तालुक्यातील भूगर्भातील पाणी खोलवर गेल्याचे चित्र गावोगावी आहे. याचमुळे तालुक्यात आत्तापर्यंत चार ते पाच वेळेस जोरदार पाऊस झाले असून खरिपाची पिकेही जोमात निघाली असली तरी जलस्रोतांना मात्र म्हणावे असे पाणी आलेले नाही.
पूर्व भागात तर अद्यापही अनेक विहिरी कूपनलिका बंद अवस्थेतच आहेत. छोट्या- मोठ्या बंधाऱ्याच्या आजूबाजूला असलेल्या जलस्रोतांना पाणी आल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीसा मिटला आहे.
थोड्याथोड्या पावसावर भूजल पातळीत वाढ झाल्याने ३१ ऑगस्टला तालुक्यातील टॅंकर प्रशासनाने बंद केले असले तरी राजापूर व आहेरवाडी येथील टँकरचे प्रस्ताव मात्र प्रशासनाकडे पडून आहेत. पाच किलोमीटरच्या आजूबाजूला पाणी उपलब्ध असल्याने टँकर बंद करावे हा नियम असल्याने तात्पुरत्या स्वरूपात या गावांचे टँकर बंद झालेले आहेत.गंभीर म्हणजे उन्हाळ्यात तब्बल ११८ गावे वाड्यावर टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची परिस्थिती उन्हाळ्यात उद्भवली होती.
आता नवरात्राकडूनच अपेक्षा!
तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस पडलेला नाही.पूर्व भागातील विहिरी अद्यापही पाणी उतरले नसल्याची स्थिती असून गणपती बाप्पा पाऊस घेऊन येईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही नदी नाले भरून वाहणारा पाऊस पूर्व भागात अद्यापही नसल्याने आता येणाऱ्या नवरात्रोत्सवाकडूनच जोरदार पावसाची अपेक्षा तालुकावासियांना लागून आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.