Water Stock Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : नायगावच्या तलावात ३५ टक्केच साठा

Naygaon Lake : नायगाव पूर्वेकडील चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावात ३५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे.

Team Agrowon

Virar News : नायगाव पूर्वेकडील चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावात ३५ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी या भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

नायगाव पूर्वेला असलेल्या चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा करणारा पाझर तलाव तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाकडून बांधण्यात आला आहे. या तलावातून नोव्हेंबरपर्यंत वसई-विरार महापालिकेतील जूचंद्र आणि बाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करण्यात येत होता.

डिसेंबरमध्ये सूर्या पाणीपुरवठा योजना टप्पा ३ मधून जूचंद्रकरांना पाणी मिळू लागल्यावर तेथील पाणी बंद करण्यात आले. आता चंद्रपाडा आणि वाकीपाडा ग्रामपंचायतीलाच या तलावातून पाणीपुरवठा होत आहे. आता उन्हाचा पारा वाढल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी होत आहे.

सध्या पाझर तलावात ३५ टक्के इतका पाणीपुरवठा आहे. चार दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला असल्याने तलावातील पाण्याची पातळी कमी होत आहे. पाऊस वेळेत झाला नाही तर पाणी संकट उद्‍भवू शकते. यासाठी आम्ही आतापासूनच ग्रामपंचायतीला सूर्याचे पाणी मिळावे, यासाठी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत.
पुष्पराज म्हात्रे, उपसरपंच, चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामपंचायत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT